Tuesday, November 25, 2008

प्लॅस्टीक जेल इफेक्ट


नमस्कार मित्रांनो,
कसे आहात?  सगळ्यात आधी 4 दिवस पोस्ट न टाकल्याबद्दल क्षमस्व. वर्क लोड जास्त असल्याने शक्य झाले नाही. 
आज आपण अक्षराकरताचा प्लॅस्टीक जेल इफेक्ट बघणार आहोत. (फोटोशॉप युजर लेव्हल - अॅडव्हान्स).
चला तर मग सुरू करूयात.





1.) बॅकग्राउंड लेअर
या आधिच्या ट्युटोरियल प्रमाणे यावेळी सुद्धा आपण एक बॅकग्राउंड लेअर तयार करून त्याला ब्राउन कलरचा रेडियल ग्रेडियंट फिल करणार आहोत. त्यासाठी वापरलेले एक्झॅक्ट कलर्स.... #2f2520 आणि  #1e1916


2) आता एखाद्या बोल्ड आणि जाड फॉन्ट मध्ये तुम्हाला हवे असलेले अक्षर टाईप करा. आणि त्याला ग्रीन कलर फिल करा.

3) आता या अक्षराच्या लेअरला आपल्याला बऱ्याच लेअर स्टाईल्स अॅप्लाय करायच्या आहेत. खाली प्रत्येक लेअर स्टाईलच्चे स्क्रिनशॉट दिलेले आहेत. त्याप्रमाणे सेटिंग्ज करत जा. 


click to enlarge

click to enlarge

click to enlarge

click to enlarge

Click to Enlarge

4) चला, आता लेटरिंग च्या लेअरवरच्या  थंबनेल वर कंट्रोल की प्रेस करून क्लीक करा. अक्षरांचे सिलेक्शन दिसायला लागेल. 

5) आता या सिलेक्शनचा नविन लेअर तयार करा.  मेन्युबारवरील सिलेक्ट > मॉडिफाय > कॉन्ट्रॅक्ट मेन्यू सिलेक्ट करा.

6) समोर ओपन झालेल्या कॉन्ट्रॅक्ट या विंडोमध्ये आवश्यकतेनुसार व्हॅल्यू भरा.

7) आता या अक्षरांना ग्लॉसी इफेक्ट देण्यासाठी आपल्याला व्हाईट ते ट्रान्स्परन्ट असा लिनिअर ग्रेडियन्ट फिल करायचा आहे.

8) हा ग्रेडियन्ट टॉप टू बॉटम असा करा. टॉपला व्हाईट आणि बॉटमला ट्रान्स्परन्ट. चला, आता या ग्लॉसी एफेक्ट देण्यासाठी हा ग्रेडियन्ट ओव्हलशेप मध्ये मधोमध कट केला पाहिजे. त्याकरता हा ग्रेडियन्टचा लेअर सिलेक्ट करून त्यावर ओव्हल सिलेक्शन करा.

9) आणि आता हा सिलेक्टेड एरिया डिलिट करा. आणि बघा.. प्लॅस्टिक जेल इफेक्ट तुमच्यासमोर असेल. फायनल रिझल्ट खालीलप्रमाणे असेल.


काय मित्रांनो, आहे की नाही सोप्पं. या ट्युटोरियल साठी वापरलेलेच रंग आणि सेटिंग्ज तुम्ही वापरली पाहिजेत असं अजिबात नाही. एकदा का सेटिंग्ज लक्षात आली की तुम्ही या सेटिंग्ज बरोबर कितीही खेळू शकता.
चला तर मग... परत भेटू.. लवकरच... पुढच्या ट्युटोरियल सोबत...

kiran.velhankar@gmail.com

No comments: