आजची पोस्ट विशेष करून ग्राफिक डिझायनर्स किंवा कमर्शियल आर्टिस्ट मित्रांसाठी...
खूप वेळा एखादा लोगो परत रिक्रिएट करताना आपल्यापुढे प्रश्न पडतो की हा फॉन्ट कुठला?
मी तुम्हाला विचारलं की गुगलच्या लोगोसाठी कोणता फॉंट वापरला आहे सांगू शकाल? तुम्ही म्हणाल, कसं शक्य आहे? त्यांनी वापरलेला फॉंट आपण ओळखूच शकणार नाही. आणि ओळखून करणार काय?
आपण फॉंट अॅडिक्ट असलो तर मात्र एखादा नवा लोगो दिसला की हा फॉंट कोणता, हे चटकन ओळखतो किंवा याच्याएेवजी तो फॉंट वापरला असता तर डिसेंसी आली असती, अशी चर्चा करतो . पण काही वेळेला एखादा नवा फॉंट आपण ओळखू शकत नाही. तो आपल्याला कुठेतरी वापरायचा तर असतो, पण त्याचा सोर्स कळत नाही. अशा वेळी व्हॉट द फॉन्ट नावाची सेवा वापरून तुम्ही तो फॉन्ट कोणता आहे, हे ओळखू शकता.
व्हॉट द फॉन्ट ही सेवा वापरण्यास अतिशय सोपी आहे. ज्या लोगोमधील फॉन्ट ओळखायचा आहे तो लोगो अथवा लोगो एखाद्या साईटवर असल्यास त्याची लिंक अपलोड करायची. त्यानंतर व्हॉट द फॉन्टमार्फत लोगोवरून कॅरेक्टर्स ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. तुम्ही गुगलचा लोगो अपलोड केला असल्यास लोगोतील G, o, o, g, l, e ही कॅरेक्टर्स बरोबर आहे किंवा कशी हे विचारले जाते. त्यात चूक असल्यास तुम्ही दुरूस्ती करू शकता. त्यानंतर सर्च म्हटल्यावर या लोगोसाठी वापरलेल्या फॉन्टचे नाव डिस्प्ले होते. त्याच फॉन्टशी साधर्म्य असलेले अनेक फॉन्टस असतील तर त्यांची यादी पाहायला मिळते.
गुगलच्या लोगोसाठी वापरलेला फॉंटः Catull BQ-Regular.
वापरून बघा आणि कॉमेंट करा..
Thanks to
No comments:
Post a Comment