Sunday, November 30, 2008

देवनागरी आकडे 3 आणि 4

नमस्कार,
आज आपण देवनागरी लिपीतल्या 3 आणि 4 या आकड्यांची वळणे बघणार आहोत. पैकी 3 या आकड्यासाठी दोन अर्धगोलांचा वापर झाला आहे, तर 4 या आकड्यामध्ये एका गोलाचा वापर झाला आहे. खाली दिलेली आकृती बघा आणि त्यानुसार सराव करा.

Thanks Prabhakar,
prabhakar.bhosale@gmail.com


Saturday, November 29, 2008

देवनागरी आकडे 1 आणि 2

नमस्कार मित्रांनो, 
2 दिवस गडबडीत असल्याने पोस्ट टाकू शकलो नाही त्याबद्दल माफ करा. आता आपण परत एकदा देवनागरी अक्षरलेखनाकडे वळू. याधी आपण सर्व अक्षरांची आणि जोडाक्षरांच्या वळणांचा अभ्यास केला आहे. आता आजपासून आपण देवनागरी आकड्यांची वळणे पाहूयात. 
आज आपण 1 आणि 2 या आकड्यांच्या वळणांचा अभ्यास करू. पैकी 1 हा आकडा गोलापासून तर 2 हा आकडा अर्धगोलापासून तयार झाला आहे. खाली दिलेल्या आकृतीप्रमाणे वळणांचे निरीक्षण करा. आणि हो... चार्टपेपरवर सराव करायला विसरू नका.

Thanks Prabhakar.
prabhakar.bhosale@gmail.com

Thursday, November 27, 2008

नमंस्कार मित्रांनो,

नमस्कार मित्रांनो,

काल मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे 2 दिवस नवीन पोस्ट टाकता येणे शक्य होत नाहीये. त्याबद्दल क्षमस्व. लवकरच भेटू.

किरण

Tuesday, November 25, 2008

प्लॅस्टीक जेल इफेक्ट


नमस्कार मित्रांनो,
कसे आहात?  सगळ्यात आधी 4 दिवस पोस्ट न टाकल्याबद्दल क्षमस्व. वर्क लोड जास्त असल्याने शक्य झाले नाही. 
आज आपण अक्षराकरताचा प्लॅस्टीक जेल इफेक्ट बघणार आहोत. (फोटोशॉप युजर लेव्हल - अॅडव्हान्स).
चला तर मग सुरू करूयात.





1.) बॅकग्राउंड लेअर
या आधिच्या ट्युटोरियल प्रमाणे यावेळी सुद्धा आपण एक बॅकग्राउंड लेअर तयार करून त्याला ब्राउन कलरचा रेडियल ग्रेडियंट फिल करणार आहोत. त्यासाठी वापरलेले एक्झॅक्ट कलर्स.... #2f2520 आणि  #1e1916


2) आता एखाद्या बोल्ड आणि जाड फॉन्ट मध्ये तुम्हाला हवे असलेले अक्षर टाईप करा. आणि त्याला ग्रीन कलर फिल करा.

3) आता या अक्षराच्या लेअरला आपल्याला बऱ्याच लेअर स्टाईल्स अॅप्लाय करायच्या आहेत. खाली प्रत्येक लेअर स्टाईलच्चे स्क्रिनशॉट दिलेले आहेत. त्याप्रमाणे सेटिंग्ज करत जा. 


click to enlarge

click to enlarge

click to enlarge

click to enlarge

Click to Enlarge

4) चला, आता लेटरिंग च्या लेअरवरच्या  थंबनेल वर कंट्रोल की प्रेस करून क्लीक करा. अक्षरांचे सिलेक्शन दिसायला लागेल. 

5) आता या सिलेक्शनचा नविन लेअर तयार करा.  मेन्युबारवरील सिलेक्ट > मॉडिफाय > कॉन्ट्रॅक्ट मेन्यू सिलेक्ट करा.

6) समोर ओपन झालेल्या कॉन्ट्रॅक्ट या विंडोमध्ये आवश्यकतेनुसार व्हॅल्यू भरा.

7) आता या अक्षरांना ग्लॉसी इफेक्ट देण्यासाठी आपल्याला व्हाईट ते ट्रान्स्परन्ट असा लिनिअर ग्रेडियन्ट फिल करायचा आहे.

8) हा ग्रेडियन्ट टॉप टू बॉटम असा करा. टॉपला व्हाईट आणि बॉटमला ट्रान्स्परन्ट. चला, आता या ग्लॉसी एफेक्ट देण्यासाठी हा ग्रेडियन्ट ओव्हलशेप मध्ये मधोमध कट केला पाहिजे. त्याकरता हा ग्रेडियन्टचा लेअर सिलेक्ट करून त्यावर ओव्हल सिलेक्शन करा.

9) आणि आता हा सिलेक्टेड एरिया डिलिट करा. आणि बघा.. प्लॅस्टिक जेल इफेक्ट तुमच्यासमोर असेल. फायनल रिझल्ट खालीलप्रमाणे असेल.


काय मित्रांनो, आहे की नाही सोप्पं. या ट्युटोरियल साठी वापरलेलेच रंग आणि सेटिंग्ज तुम्ही वापरली पाहिजेत असं अजिबात नाही. एकदा का सेटिंग्ज लक्षात आली की तुम्ही या सेटिंग्ज बरोबर कितीही खेळू शकता.
चला तर मग... परत भेटू.. लवकरच... पुढच्या ट्युटोरियल सोबत...

kiran.velhankar@gmail.com

Wednesday, November 19, 2008

ट्रान्स्परन्ट ग्लास लेटरिंग इफेक्ट

नमस्कार मित्रांनो,
आज आपण फोटोशॉपमध्ये ट्रान्स्परन्ट ग्लास इफेक्ट बघूयात. आजचे ट्युटोरियल फोटोशॉपच्या अॅडव्हान्स युजर्ससाठी आहे. आजच्या या ट्युटोरियल मध्ये आपण काही सुपर लेअर इफेक्ट्सचा वापर करणार आहोत. फायनल रिझल्ट खाली दाखविल्याप्रमाणे असेल.

एकूण 7 भागांत आपण हे ट्युटोरियल करणार आहोत. चला तर मग सुरवात करुयात.

भाग 1.
बॅकग्राउंड लेअर
या ट्युटोरियलची सुरवात करण्यासाठी आपल्याला एका मस्त बॅकग्राउंड लेअरची गरज भासणार आहे. सगळ्यात आधी आपण ही बॅकग्राउंड तयार करूयात. जरी अधिकाधिक ग्रेडियंटस हे दोन रंगांत असले तरी फोटोशॉपमध्ये अधिकाधिक कॉम्प्लेक्स ग्रेडियंट तुम्ही तयार करू शकता. फोटोशॉप ओपन केल्यावर डाव्या कोपऱ्यात वर असलेल्या ग्रेडियंट आयकॉनवर क्लिक केल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेडियंट दाखवणारे पॅनेल ओपन होईल. याच्या साह्याने तुम्ही विविधरंगी ग्रेडियंट तयार करू शकता. याठिकाणी आपल्याला 3 रंगांचा ग्रेडियंट (हिरवा ते निळा) तयार करायचा आहे. 
त्यासाठी रेडियल ग्रेडियंट हा ऑप्शन सिलेक्ट करा. (याचा सेंटरिंग पॉईट हा तळात उजवीकडे असावा Bottom Right)
पुढील 3 रंग त्यासाठी निवडले आहेत. (तुम्ही हवे असल्यास वेगळे रंग निवडू शकता)

Color 1 - #2e5b15
Color 2 - #103533
Color 3 - #090e13


भाग 2
चला बॅकग्राउंड तयार झाली. आता ग्लास इफेक्ट देण्यासाठी एका अक्षराची गरज आहे. मी माझ्या नावाचे आद्याक्षर म्हणून K हे अक्षर सिलेक्ट केले आहे. यासाठी सेरिफ मधला एखादा चांगला फॉन्ट निवडा आणि त्याला छानसा ब्लू ग्रीन कलर फिल करा. मी इथे #41a993 ही शेड वापरला आहे.


भाग 3
आता विविध प्रकारच्या लेअर इफेक्ट आपण वापरणार आहोत. त्यांची सेटींग्ज खाली दाखवली आहेत त्याप्रमाणे करत जा.

click to Enlarge

click to Enlarge

click to Enlarge

click to Enlarge

click to Enlarge

click to Enlarge


चला, खाली दाखविल्याप्रमाणे इफेक्ट दिसणे अपेक्षित आहे.
 

इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण लाईट हा खालून येत आहे असे गृहित धरलेले आहे.  त्यामुळे अक्षराचा इफेक्ट आणि बॅकग्राउंडचा ग्रेडियंट हे एकमेकांशी मॅच होत आहेत. त्याचप्रमाणे आपण लाईटच्या विरुद्ध दिशेला फेंट (लाईट) असे हायलाईटस क्रिएट केले आहेत. काचेतून होणाऱ्या रिफ्लेक्शनचा इफेक्ट मिळतो आहे.

भाग 4
आता कंट्रोल की प्रेस करून लेअर पॅलेट मधील  K अक्षराच्या थंबनेलवर  क्लिक करा. K अक्षराचे सिलेक्शन दिसायला लागेल. हे सिलेक्शल डिसिलेक्ट न करता नवीन लेअरवर घ्या. आता या सिलेक्शनला आपल्याला खालील बाजून येणारा व्हाईट टू ट्रान्स्परन्ट असा ग्रेडियंट फिल करायचा आहे. खालील आकृती बघा आणि त्याप्रमाणे कृती करत जा.


 1. लेटर सिलेक्ट करून नवीन लेअर सिलेक्ट करा.

2. वरील प्रमाणे ग्रेडियंट सेटींग्ज करा

3. सिलेक्शनला ग्रेडियंट फिल करा. बॅकग्राउंड लेअर ऑफ केल्यावर वरील प्रमाणे इफेक्ट दिसला पाहिजे. 

4. बॅकग्राउंड लेअर आणि अक्षराचा मुळ लेअर ऑन केल्यावर वरीलप्रमाणे इफेक्ट दिसेल.

5. आता आत्ता तयार केलेला ग्रेडियंटचा लेअर सिल्केट करून तो फेड करण्यासाठी त्याचा ब्लेंडिंग मोड ओव्हरलेला (Overlay) सेट करा. चला... इथपर्यंत सगळं नीट झालं असेल तर आपण पुढच्या भागाकडे वळूयात.

भाग 5
परत एका भाग 4 मध्ये प्रमाणे कंट्रोल की प्रेस करून लेअर पॅलेटवरील अक्षराच्या थंबनेलवर क्लिक करा. अक्षराचे सिलेक्शन दिसायला लागेल. हे सिलेक्शन नवीन लेअर वर घ्या. आणि भाग 4 मध्ये वापरलेल्या व्हाईट टू ट्रान्स्परन्ट या ग्रेडियंट ने फिल करा. मात्र यावेळी त्याची दिशा वरून खाली (व्हाईट वर आणि ट्रान्स्परन्ट फिल खाली) अशी असली पाहिजे. खालील आकृती पाहा. 


1) ग्रेडियंट फिल

2) लेअर सिलेक्ट करून ओपॅसिटी 40 टक्के करा.

भाग 6.
आता हा शेवटचा लेअर सिलेक्ट असताना खाली दाखविल्याप्रमाणे एक एलिप्स (अर्धवर्तुळाकार) सिक्शन ड्रॉ करा. आणि ते सिलेक्शन इन्व्हर्स करून डिलीट करा. यामुळे व्हाईट ग्रेडिएन्ट एकदम कट होईल व आपल्याला ग्लासी लुक मिळतो. याप्रकारे विविध प्रकारचे शेप वापरून तुम्ही विविध इफेक्ट मिळवू शकता.  खालील आकृती बघा.


भाग 7
चला. आता काच तर तयार झाली. आता तीला थोडं चमकावूया..... :) म्हणजेच थोडे हायलाईट अॅड करूयात. हे आपण करणार आहोत ते कस्टम शेप टूल वापरून. (U)  यापैकी पॉलिगॉन टूल सिलेक्ट करा आणि खाली दाखविल्याप्रमाणे सेटींग्ज करा

आता बॅकग्राउंड कलर व्हाईट असताना तुम्हाला हवे असतील तिथे म्हणजे जास्त इन्टेन्सिटीच्या हायलाईटच्या ठिकाणी हे स्टार आवश्यकते प्रमाणे ड़्रॉ करा. ..... .हुश्श.. झालं एकदाचं.. फायनल इफेक्ट असे दिसेल....
 

 हे ट्युटोरियल अशाच पद्धतीनी केलं पाहिजे किंवा ही सगळी सेटिंग्ज अशीच असला पाहिजेत असं नाही. या प्रकारच्या बॅकग्राउंडला आणि या रंगांना ही सेटींग्ज योग्य वाटली.  तुम्ही ती तुमच्या सोयीनी तुम्हाला चांगली वाटतील तशी बदलू शकता. शेवटी फायनल रिझल्ट महत्त्वाचा. तुम्हालाही अशी काही ट्युटोरियल्स माहित असतील तर अवश्य शेअर करा. आणि हो तुम्हाला हे ट्युटोरियल कसं वाटलं त्याबद्दल कॉमेंट करायलाही विसरू नका.
kiran.velhankar@gmail.com

Tuesday, November 18, 2008

ओळखा पाहू कोणता फॉन्ट?

नमस्कार मित्रांनो,

आजची पोस्ट विशेष करून ग्राफिक डिझायनर्स किंवा कमर्शियल आर्टिस्ट मित्रांसाठी...
खूप वेळा एखादा लोगो परत रिक्रिएट करताना आपल्यापुढे प्रश्न पडतो की हा फॉन्ट कुठला? 
मी तुम्हाला विचारलं की गुगलच्या लोगोसाठी कोणता फॉंट वापरला आहे सांगू शकाल? तुम्ही म्हणाल, कसं शक्य आहे? त्यांनी वापरलेला फॉंट आपण ओळखूच शकणार नाही. आणि ओळखून करणार काय? 
आपण फॉंट अॅडिक्ट असलो तर मात्र एखादा नवा लोगो दिसला की हा फॉंट कोणता, हे चटकन ओळखतो  किंवा याच्याएेवजी तो फॉंट वापरला असता तर डिसेंसी आली असती, अशी चर्चा करतो . पण काही वेळेला एखादा नवा फॉंट आपण ओळखू शकत नाही. तो आपल्याला कुठेतरी वापरायचा तर असतो, पण त्याचा सोर्स कळत नाही. अशा वेळी व्हॉट द फॉन्ट नावाची सेवा वापरून तुम्ही तो फॉन्ट कोणता आहे, हे ओळखू शकता. 

व्हॉट द फॉन्ट ही सेवा वापरण्यास अतिशय सोपी आहे. ज्या लोगोमधील फॉन्ट ओळखायचा आहे तो लोगो अथवा लोगो एखाद्या साईटवर असल्यास त्याची लिंक अपलोड करायची. त्यानंतर व्हॉट द फॉन्टमार्फत लोगोवरून कॅरेक्टर्स ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. तुम्ही गुगलचा लोगो अपलोड केला असल्यास लोगोतील G, o, o, g, l, e ही कॅरेक्टर्स बरोबर आहे किंवा कशी हे विचारले जाते. त्यात चूक असल्यास तुम्ही दुरूस्ती करू शकता. त्यानंतर सर्च म्हटल्यावर या लोगोसाठी वापरलेल्या फॉन्टचे नाव डिस्प्ले होते. त्याच फॉन्टशी साधर्म्य असलेले अनेक फॉन्टस असतील तर त्यांची यादी पाहायला मिळते. 


गुगलच्या लोगोसाठी वापरलेला फॉंटः Catull BQ-Regular.
वापरून बघा आणि कॉमेंट करा..

Thanks to

Monday, November 17, 2008

इमेजेससाठी ‘वेट’ रिडक्शन




नमस्कार मित्रांनो,
आजची पोस्ट विशेषतः वेब डिझायनर्स मित्रांसाठी सर्वाधिक उपयुक्त आहे.

एखादी साईट अोपन होताना खूप वेळ लागला तर समजायचं की त्या साईटवर खूप हेवी फाईल्स आहेत. या सर्व फाईल्स डाऊनलोड होण्यासाठी वेळ लागतो. टेक्स्टची साईज इतर कन्टेन्टपेक्षा कमी असते. इमेजेसची साईज कमी न केल्यास वेबसाईट ओपन होण्यास वेळ लागतो. सोशल नेटवर्किंग साईटवरदेखील इमेजेस अपलोड करताना फाईल साईज अमूक एमबीपर्यंत असावी असा मेसेज दिला जातो. त्याहून अधिक साईजच्या इमेजेस अॅक्सेप्ट केल्या जात नाहीत. इमेजेसची फाईल साईज कमी करण्यासाठी प्रयत्न केले तर त्याचा दर्जा कमी होऊ शकतो. पण दर्जा कमी न करतादेखील ‘हेवी’ इमेजेसचे ‘वजन’ कमी करता येते... स्मश ईट ही सेवा वापरून आपण इमेजेसची फाईल साईज कमी करू शकतो. या सेवेचा फायदा म्हणजे फाईलचा दजर्जाही कायम राहतो आणि फाईल साईज किती टक्क्यांनी कमी झाली हे कळते. फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर वापरून तुम्ही या गोष्टी लीलया करू शकता. पण त्यात इमेजचा दर्जा घसरण्याची शक्यता असते. स्मश ईटमध्ये विशिष्ट इमेज अॉप्टिमायझेशन तंत्रज्ञान वापरून बाईट्स रिड्यूस केले जातात. त्यामुळे इमेजच्या व्हिज्युअस क्वालिटीला धक्का लागत नाही. स्मश ईटचा वापर तीन मार्गांनी करता येतोः  १. स्मश ईटवर जाऊन एक किंवा अनेक इमेजेस अपलोड करणे  २. इमेज कुठे होस्ट केलेल्या असतील तर त्यांच्या लिंक्स देणे  ३. फायरफॉक्स एक्स्टेंशनचा वापर करून इमेज साईज कमी करणे. 

साईज कमी केलेल्या इमेजेस तुम्ही झिप स्वरूपात डाऊनलोड करून घेऊ शकता. वेबसाईट डिझायनर्स किंवा अपलोडर्स यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयोगी आहे. वापरून बघा आणि उपयुक्तता कळवा.

with thanks from

Sunday, November 16, 2008

ओम या अक्षराची वळणे

नमस्कार मित्रांनो,
आज आपण शेवटचे अक्षर म्हणजे ओम ची वळणे बघणार आहोत. आपण ज्या पद्धतीने ओम लिहीतो तसा इथे ब्लॉगर मध्ये टाईप करण्याचा खूप प्रयत्न केला पण सापडलाच नाही. त्यामुळे माफ करा. आकृती बघा म्हणजे सगळी वळणे व्यवस्थित कळतील. यामध्ये अर्धवर्तुळखंडांचा वापर झालेला दिसून येतो. खालील आकृती बघा आणि त्यानुसार सराव करा. उद्यापासून 0 ते 9 या आकड्यांच्या वळणांचा ्अभ्यास करू.


Thanks Prabhakar
Prabhakar.bhosale@gmail.com

Saturday, November 15, 2008

जोडाक्षरे द्ग आणि द्न

आज ही शेवटची जोडाक्षरांची जोडी. ही आहे द्ग आणि  द्न. इथे ब्लॉगर मध्ये टाईप करताना नीट दिसत नाहीयेत. पण आकृती बघा म्हणजे नीट कळेल. या दोन्ही जोडाक्षरांतपण द  हे मुळाक्षर आहे. आणि त्याला अनुक्रमे ग आणि न ही मुळाक्षरे जोडली गेल्यामुळे त्यांच्या मुळ वळणांत थोडा फरक पडतो. आकृती बघा आणि त्यानुसार सराव करा.

Thanks Prabhakar

Friday, November 14, 2008

जोडाक्षरे द्भ आणि द्ब

चला, आज पुढची दोन जोडाक्षरे बघूयात. ही आहेत द्भ आणि द्ब. या दोनही जोडाक्षरांत द हे मुळाक्षर आहे.  या मुळाक्षराला अनुक्रमे भ आणि ब ही मुळाक्षरे जोडली जातात आणि त्यांच्या मुळ वळणांत थोडा बदल होतो. खालील आकृती बघा आणि सराव मात्र आवश्यक...


ThanksPrabhakar

Thursday, November 13, 2008

जोडाक्षरे द्ध आणि द्व

नमस्कार,
कसे आहात?

आज पुढच्या दोन जोडाक्षरांच्या वळणांचा अभ्यास करूयात. ही जोडाक्षरे आहेत द्ध आणि द्व. या दोनही जोडाक्षरांत द या मुळाक्षर आहे. खाली दिलेली आकृती बघा आणि सराव मात्र निश्चित करा.
 




Thanks Prabhakar,
Prabhakar.bhosale@gmail.com

Wednesday, November 12, 2008

जोडाक्षरे ह्य आणि द्य

नमस्कार दोस्तांनो,
आज आपण आणखी दोन जोडाक्षरे बघू. ही आहेत ह्य आणि द्य. या जोडाक्षरांमध्ये अनुक्रमे ह आणि द ही मुळाक्षरे आहेत. या दोन्ही अक्षरांना य हे मुळाक्षर जोडले गेले आहे.  खालील वळणे बारकाईने बघा आणि सराव करा.




Thanks Prabhakar,
prabhakar.bhosale@gmail.com

Tuesday, November 11, 2008

जोडाक्षरे हृ आणि ह्म

नमस्कार,

आजची मुळाक्षरे नसून जोडाक्षरे आहेत.  थोडी अवघड पण आहेत. ती आहेत हृ आणि ह्म. या दोन्ही जोडाक्षरांत ह  हे मुळाक्षर कायम आहे. खाली दिलेली वळणे बघा आणि सराव करा.
 



Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com

Monday, November 10, 2008

मुळाक्षरे ऋ आणि श्र

नमस्कार दोस्तांनो...

आज आपण ज्या अक्षरांची वळणे बघणार आहोत, ती थोडीशी किचकट आहेत. त्यासाठी जास्त सरावाची गरज आहे. ही मुळाक्षरे आहेत ऋ आणि क्ष. या अक्षरांच्या वळणांमध्ये अर्धगोल आणि तिरक्या रेषांचा वापर आढळतो. खालील आकृती बघा आणि सराव करा.
आणि हो.... तुम्हाला या पोस्ट कशा वाटतात? अजून  काही सुधारणा हवी असेल तर जरूर कळवा आणि कॉमेंटही करा.




Thanks Pranbhakar
prabhakar.bhosale@gmail.com

Sunday, November 9, 2008

मुळाक्षरे त्र आणि ञ

नमस्कार मित्रांनो,
आज आपण त्र आणि ञ या दोन मुळाक्षरांची वळणे बघूयात. या दोनही अक्षरांची वळणे अर्धगोलांपासून तयार झाली असून या अर्धगोलांचा आकार मोठा आहे. खाली दिलेली वळणे बघा आणि सराव करा.



Thanks Prabhakar,
prabhakar.bhosale@gmail.com


Saturday, November 8, 2008

मुळाक्षरे ट,ठ आणि ढ

नमस्कार दोस्तांनो,

सराव सुरू आहे ना?  आज आपण ट, ठ आणि ढ ही मुळाक्षरे बघणार आहोत. या मुळाक्षरांमध्येही अर्धवर्तुळखंडांचा वापर आढळून येतो. मात्र यातील अर्धगोलांचा आकार मोठा आहे. खालील आकृती बघा आणि त्यानुसार सराव करा.




Thanks Prabhakar

Friday, November 7, 2008

मुळाक्षरे ल आणि ज्ञ

नमस्कार,
आज आपण ल आणि ज्ञ या दोन मुळाक्षरांची वळणे बघुयात. या दोन अक्षरांमध्ये अर्धवर्तुळखंडांचा वापर केलेला आढळून येतो. या पैकी ज्ञ हे अक्षर थोडे किचकट आहे. पण थोडा जास्त सराव केलात तर अवघड जाणार नाही. खालील आकृती बघा आणि चार्टपेपर वर सराव करा.



Thanks Prabhakar

Thursday, November 6, 2008

मुळाक्षरे त आणि ळ


नमस्कार, 
आज आपण त आणि ळ या दोन मुळाक्षरांच्या वळणांचा अभ्यास करणार आहोत.  .यापैकी ळ हे मुळाक्षर उभ्या वर्तुळखंडातून तयार झाले आहे.  त या मुळाक्षराचे वळणही ळ या मुळाक्षराच्या जवळ जाणारे आहे. खालील आकृती बघा आणि त्यानुसार सराव करायला विसरू नका.