Saturday, November 29, 2008

देवनागरी आकडे 1 आणि 2

नमस्कार मित्रांनो, 
2 दिवस गडबडीत असल्याने पोस्ट टाकू शकलो नाही त्याबद्दल माफ करा. आता आपण परत एकदा देवनागरी अक्षरलेखनाकडे वळू. याधी आपण सर्व अक्षरांची आणि जोडाक्षरांच्या वळणांचा अभ्यास केला आहे. आता आजपासून आपण देवनागरी आकड्यांची वळणे पाहूयात. 
आज आपण 1 आणि 2 या आकड्यांच्या वळणांचा अभ्यास करू. पैकी 1 हा आकडा गोलापासून तर 2 हा आकडा अर्धगोलापासून तयार झाला आहे. खाली दिलेल्या आकृतीप्रमाणे वळणांचे निरीक्षण करा. आणि हो... चार्टपेपरवर सराव करायला विसरू नका.

Thanks Prabhakar.
prabhakar.bhosale@gmail.com

1 comment:

Anonymous said...

आरेखनाची समृद्ध परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे. असे असतांनाही जगभरात जपानी आरेखन, युरोपियन आरेखन याप्रमाणेच भारतीय आरेखनाचा मान नाही, इतकेच काय तर पुसटसा उल्लेखही होत नाही याची खंत वाटते. भारतात विकल्या जाणा-या किती गुणस्यांमध्ये (प्रॉडक्टांमध्ये) भारतीय आरेखन शैली झळकते ह्याचा शोध घेतला तर केवळ खेदच हाती येतो. अशा परिस्थितीत मराठीमध्ये आरेखनाबद्दल नियमित लिखाण करण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे. आपले हार्दिक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!