Monday, November 17, 2008

इमेजेससाठी ‘वेट’ रिडक्शन




नमस्कार मित्रांनो,
आजची पोस्ट विशेषतः वेब डिझायनर्स मित्रांसाठी सर्वाधिक उपयुक्त आहे.

एखादी साईट अोपन होताना खूप वेळ लागला तर समजायचं की त्या साईटवर खूप हेवी फाईल्स आहेत. या सर्व फाईल्स डाऊनलोड होण्यासाठी वेळ लागतो. टेक्स्टची साईज इतर कन्टेन्टपेक्षा कमी असते. इमेजेसची साईज कमी न केल्यास वेबसाईट ओपन होण्यास वेळ लागतो. सोशल नेटवर्किंग साईटवरदेखील इमेजेस अपलोड करताना फाईल साईज अमूक एमबीपर्यंत असावी असा मेसेज दिला जातो. त्याहून अधिक साईजच्या इमेजेस अॅक्सेप्ट केल्या जात नाहीत. इमेजेसची फाईल साईज कमी करण्यासाठी प्रयत्न केले तर त्याचा दर्जा कमी होऊ शकतो. पण दर्जा कमी न करतादेखील ‘हेवी’ इमेजेसचे ‘वजन’ कमी करता येते... स्मश ईट ही सेवा वापरून आपण इमेजेसची फाईल साईज कमी करू शकतो. या सेवेचा फायदा म्हणजे फाईलचा दजर्जाही कायम राहतो आणि फाईल साईज किती टक्क्यांनी कमी झाली हे कळते. फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर वापरून तुम्ही या गोष्टी लीलया करू शकता. पण त्यात इमेजचा दर्जा घसरण्याची शक्यता असते. स्मश ईटमध्ये विशिष्ट इमेज अॉप्टिमायझेशन तंत्रज्ञान वापरून बाईट्स रिड्यूस केले जातात. त्यामुळे इमेजच्या व्हिज्युअस क्वालिटीला धक्का लागत नाही. स्मश ईटचा वापर तीन मार्गांनी करता येतोः  १. स्मश ईटवर जाऊन एक किंवा अनेक इमेजेस अपलोड करणे  २. इमेज कुठे होस्ट केलेल्या असतील तर त्यांच्या लिंक्स देणे  ३. फायरफॉक्स एक्स्टेंशनचा वापर करून इमेज साईज कमी करणे. 

साईज कमी केलेल्या इमेजेस तुम्ही झिप स्वरूपात डाऊनलोड करून घेऊ शकता. वेबसाईट डिझायनर्स किंवा अपलोडर्स यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयोगी आहे. वापरून बघा आणि उपयुक्तता कळवा.

with thanks from

1 comment:

Anonymous said...

Luv your tutorials, even if i can't read hindi..