Saturday, October 11, 2008

चार जीबींचे ‘पार्सल’

नमस्कार मित्रांनो,
आजची ही पोस्ट फारच भन्नाट आहे. आपल्याला सगळ्यांनाच हेवी डिझाइनच्या फाईल्स ऑनलाईन पाठवताना अनेक अडचणी येतात. पण जर तुम्ही चक्क 4 GB ची फाईल ऑनलाईन पाठवू शकलात तर... आहे की नाही कमाल.. आजची हि पोस्ट माझा मित्र अमीतच्या सौजन्याने...
मोठ्या आकाराच्या फाईल्स पाठवण्यासाठी साध्या ई-मेल सेवा याबाबतीत अगदीच कुचकामी ठरतात. त्यातून तुम्ही फार-फार तर २० ते २५ एमबी क्षमतेच्या फाईल्स पाठवू शकता. पण काहीवेळा आपल्याला १ जीबीहून अधिक क्षमतेच्या फाईल्स पाठवाव्या लागतात, उदा. एखादे मोठे डिझाईन, व्हिडिओ फुटेज, मूव्ही फाईल किंवा बॅक-अप डेटा. तेव्हा कामाला येणारी एक सेवा म्हणजे सिव्हिल नेटीझन. 

सिव्हिल नेटीझन हा एक डेस्कटॉप क्लाएंट आहे. पण हा इतका शक्तीशाली आहे की याचा वापर करून तुम्ही तब्बल चार जीबी क्षमतेच्या फाईल्सही लीलया ट्रान्स्फर करू शकता. विंडोज आणि मॅकिन्तोश या अॉपरेटिंग सिस्टिम्ससाठी सिव्हिल नेटीझन क्लाएंट उपलब्ध आहे. यातील पार्सल ही संकल्पना भन्नाट आहे. फाईल पाठवताना अट फक्त एकच...तुम्ही ज्याला ती पाठवणार आहात त्याच्याकडेही सिव्हिल नेटीझन क्लाएंट असणं आवश्यक आहे. सिव्हिल नेटीझन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. सिव्हिल नेटीझन इन्स्टॉल केल्यानंतर केवळ दोन स्टेप्समध्ये आपण फाईल पाठवू शकतो आणि केवळ एका स्टेपपमध्ये समोरचा ती डाऊनलोड करू शकतो. सिव्हिल नेटीझन क्लाएंट ओपन केल्यानंतर पुढील स्टेप्स फॉलो कराः 

पॅकः
 तुम्हाला जी फाईल पाठवायची आहे ती सिलेक्ट करा. तुमच्या पार्सलला नाव द्या आणि पॅकेज पार्सल म्हणा 

सेन्डः
 तुम्ही डेस्कटॉप मेल क्लाएंट (आऊटलूक, अॅपल मेल) किंवा इतर मेल सेवा (जी-मेल, याहू, रेडिफ इ.) वापरून समोरच्या व्यक्तीस पार्सल स्लिप पाठवू शकता. पार्सल स्लिप म्हणजे एन्क्रिप्ट केलेले टेक्स्ट मॅटर असते. हे जसेच्या तसे कॉपी करून समोरच्या व्यक्तील मेलद्वारे पाठवायचे. 

पिक-अप अॅण्ड अनपॅकः
 समोरच्या व्यक्तीने ही स्लिप त्याच्याकडे असणाऱ्या सिव्हिल नेटीझनच्या पिक-अप बॉक्समध्ये पेस्ट केले की डाऊनलोड पार्सल लिंक अॅक्टिव्हेट होईल. 
ट्रॅकः आपण आतापर्यंत पाठवलेले पार्सल्स, समोरच्या व्यक्तीने डाऊनलोड केलेले पार्सल याचा संपूर्ण ट्रॅक आपण ठेवू शकतो. 


मी आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्या सेवांमध्ये ही सवर्वांत अत्याधुनिक आणि सुरक्षित सेवा आहे. तुम्हीही हे सेवा ट्राय करू शकता. तुम्हाला जर तुलनेने कमी हेवी फाईल्स पाठवायच्या असतील तर तुम्ही इतर सेवांचा वापर करू शकता. 


3 comments:

Anonymous said...

Khoop chaan.............pan use kelyashivay kalnar nahi.

kiran said...

It works!

shraddha said...

thnx for the info... very imp...

Regards,