नमस्कार दोस्तांनो,
इन्फोग्राफिक्स म्हणजे काय? आणि त्याचा वापर कशासाठी आणि कुठे होतो हे आपण याआधीच्या दोन पोस्ट्स मध्ये बघितले. आता प्रत्यक्ष इन्फोग्राफिक्स करायचं कसं आणि ते करताना काय काळजी घ्यायची हे बघूयात. पण.... त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे. चांगलं इन्फोग्राफिक्स तयार करण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या बघण्यात आलेली इन्फोग्राफिक्स चांगली की वाईट हे कळालं तर ते जास्त चांगलं आहे. चांगलं इन्फोग्राफिक्स कसं ओळखायचं यासाठी जरा आपल्याला वृत्तपत्रविद्येच्या अभ्यासक्रमाचा आधार घेतला पाहिजे.
जर्नालिझमचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी कोणती यासाठी एक सुत्र शिकवलं जातं. ते म्हणजे 5w1h. आता तुम्ही म्हणाल की झालं परत झेंगट सुरू. पण हे अगदी सोप्पं आहे. हे 5W म्हणजे....
1) what ?
2) where?
3) when?
4) why?
5) who?
आणि 1h म्हणजे How?
एखादी बातमी लोकांना अगदी व्यवस्थित कधी कळते तर जेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात तेव्हाच. म्हणजेच त्या बातमीतून काय, कुठे, कधी, का, कोणी आणि कसं हे वाचताक्षणीच कळालं पाहिजे. हाच नियम चांगल्या इन्फोग्राफिकलाही लागू पडतो. आहे ना सोप्पं.
आता हे पुढे दिलेलं ग्राफिक बघा. न्यूजविकचे आर्ट डिरेक्टर कार्ल गुड यांनी हे केलेले आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष डिक चेनी हे शिकारीला गेले असताना त्यांनी चूकून त्यांच्या सहकाऱ्यावरच शॉटगन मधून गोळी झाडली. ही सगळी घटना कार्ल गुड यांनी इन्फोग्राफिकमधून दाखवली आहे. यात 5W1H अगदी योग्य प्रकारे वापरले आहे. हे ग्राफिक बघितवल्यावर वाचकाला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. फायनल इन्फोग्राफिक करण्याआधी कार्ल गुड यांनी त्यासाठी केलेले रफ स्केच पण सोबत दाखवत आहे. तुम्ही इन्फोग्राफिक करण्याआधी केलेले रफ स्केच आणि तुमचे फायनल ग्राफिक यात जर साम्य असेल तरच तुम्ही केलेले ग्राफिक परिपूर्ण होते. खाली दिलेले ग्राफिक त्यादृष्टीने नीट बघा.
Click on the Graphic to Enlarge.
Click on the Graphic to Enlarge.
चला तर मग आजपासून वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होणाऱ्या इन्फोग्राफिक्सची चिरफाड सुरू करा.
पुढच्या पोस्टमध्ये आपण इन्फोग्राफिक्सचे उद्दीष्ट्य काय? आणि इन्फोग्राफिक्सचे काही प्रकार जे आम्ही वापरतो यांची माहिती घेऊ. भेटू यात तर परत. इथेच लवकरच! तुम्हाला काही प्रश्न अथवा शंका असतील तर जरूर कळवा.
kiran.velhankar@gmail.com
No comments:
Post a Comment