Tuesday, October 14, 2008

उत्तम लोगो तयार करण्यासाठी...


नमस्कार मित्रांनो,

आजचा विषय थोडा वेगळा आहे. इंटरनेटवर सर्फींग करताना लोगो डिझाईनवरचा हा लेख वाचण्यात आला. त्यातले मुद्दे तुमच्यापुढे मांडतोय.

आपण सगळे डिझायनर्स विविध प्रकारचे लोगो बघतो, करतो. पण असा एखादाच लोगो असतो की जो मनाला भावतो. नकळत आपल्या तोंडून शब्द बाहेर पडतात, ``आईला, 1 नंबर लोगो आहे''.  हा लोगो 1 नंबर उगाचच होत नाही त्यामागे कोणीतरी केलेला अभ्यास आणि विचार असतो. असा हा 1 नंबर लोगो क्रिएट करायचा तर तो खाली सांगीतल्याप्रमाणे असला पाहिजे.

1.) या लोगोमागे काहीतरी विचार, अभ्यास असला पाहिजे. आणि तो विचार सांगता आला पाहिजे. (It must be describable)
2.) हा लोगो लक्षात राहण्याजोगा पाहिजे. (It must be memorable)
3.) हा लोगो रंगाशिवाय इफेक्टिव असला पाहिजे.  (It must be effective without colour)
4.) आणि हा लोगो विविध आकारात स्केलेबल असला पाहिजे. म्हणजे 1 सेंटीमीटर पासून 1 फूटापर्यंत कितीही आकारात व्हिजिबल असला पाहिजे.

यापैकी पहिला आणि दुसरा पॉईंट एकमेकांशी संबंधित आहेत.  जर तुम्ही लोगो तयार करताना त्यामागे काही विचारच नसेल तर तो समजावून सांगणार कसा? आणि तुम्ही तो सांगू शकला नाहीत तर तो लक्षात तरी कसा राहणार?

तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण याठिकाणी आकार हा महत्त्वाचा आहे. रंग हा दूय्यम आहे. लोगो डिझाईन करताना रंगाचा वापर हा सगळ्यात शेवटी करावा. कारण तुम्ही तयार केलेला लोगो जर ब्लॅक व्हाईट मध्ये इफेक्टिव नसेल तर कुठलाही रंग वापरून हा लोगो इफेक्टिव्ह होणार  नाही.

चौथा मुद्दा हा बरेच डिझायनर्स लक्षात घ्यायला विसरतात. तुम्ही केलेला लोगो पेनापासून होर्डिंगपर्यंत कुठेही वापरता आला पाहिजे. आणि त्याची व्हिजिबिलीटी ही तेवढीच राहिली पाहिजे.

खाली दिलेला लोगो पाहा. आपण वर बघितलेल्या मुद्द्यांचा विचर करून केलेला हा लोगो आहे. य़ुके तल्या डिस्टंन्स लर्निंगसाठीच्या ओपन युनिव्हर्सिटीचा आहे.  ओपन युनिव्हर्सिटी या कन्सेप्टचा अतिशय प्रभावी वापर इथे केलेला आढळतो (यु मध्ये ओपन ओ). आणि विशेष म्हणजे हा लोगो आधी सांगितल्याप्रमाणे पेनापासून होर्डिंगपर्यंत कुठेही वापरला जाऊ शकतो.






असा हा memorable, scalable, describable, reproducable लोगो इतर लोगोंपेक्षा वेगळा उठून दिसतो.

kiran.velhankar@gmail.com
   

2 comments:

Dattatray Aware said...

दत्तात्रय आवारे
आपन लोगो तयार करण्य़ा विषयी कोणतीच कॄत्ती सांगीतली नाही.सविस्तर खुलासा करुनच लेख लिहावा हि अग्रहाची विनंती.

Anonymous said...

दत्तात्रयजी,
नमस्कार,

सदर पोस्ट ही लोगो कसा तयार करावा यासंबंधी नसून लोगो तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत यासंबंधी आहे. लोगो तयार करण्याच्या पद्धती या माणसागणीक आणि सॉफ्टवेअरनुसार बदलतात. मात्र लोगो डिझाईन करण्यामागे कोणताच विचार नसेल तर त्या लोगोचा काहीच उपयोग नाही.