मागच्या पोस्टमध्ये आपण लेअर्स पॅलेटची माहिती घेतली. आता आज आपण लेअर्सच्या फिचर्सची माहिती घेणार आहोत.
खाली दिलेली आकृती बघा.
लेअर ओपॅसिटी - याद्वारे आपण लेअरची ट्रान्स्परन्सी कंट्रोल करतो. 0 % म्हणजे पूर्ण ट्रान्स्परन्ट आणि 100% म्हणजे पूर्ण ओपेक.
लॉक ऑल- या चेक बॉक्स वर क्लिक केल्यावर (एनेबल केल्यावर) सिलेक्टेड लेअर् लॉक होतो. म्हणजेच आता तुम्ही कोणत्याही प्रकारचं एडिटींग करू शकत नाही.
लॉक पोझिशन- हा चेकबॉक्स क्लिक केल्यावर तुम्ही या लेअरवरील इमेजचे एडिटींग करू शकता पण या इमेजची पोझिशन (x, y) बदलू शकत नाही.
लॉक इमेज पिक्सेल्स- हा चेकबॉक्स एनेबल केल्यावर तुम्ही या लेअर वर कुठल्याही प्रकारचे ड्रॉइंग करू शकत नाही.
लॉक ट्रान्स्परन्ट- हा चेकबॉक्स एनेबल केल्यावर लेअरवरील ट्रान्स्परन्ट भाग वगळून इतर भागावर तुम्ही ड्रॉईंग करू शकता. ट्रान्स्परन्ट भाग लॉक असल्यामुळे त्याच्यावर ड्रॉइंग करता येत नाही.
डिलीट- या आयकॉनवर क्लिक केल्यावर सिलेक्टेड लेअर डिलीट होतो (इफेक्टसह). या व्यतिरिक्त सिलेक्टेड लेअर ओढून या आयकॉनवर आणून सोडलात तरी तो लेअर डिलीट होतो.
न्यू लेअर - या आयकॉनवर क्लिक केल्यावर नवीन ब्लॅंक लेअर तयार होतो. किंवा एखाद्या आधीच्या लेअरचा थंबनेल जर या आयकॉनवर ओढून आणून सोडलात तर त्या लेअर चा डुप्लिकेट लेअर तयार होतो.
न्यू अॅडजेस्टमेंट लेअर- हा ऑप्शन फार महत्त्वाचा आहे. आपण ज्यावेळी एखादी इमेज अॅडजेस्ट करतो, म्हणजे ब्राईटनेस, कॉन्स्ट्रास्ट, ह्यू, सॅच्यूरेशन इत्यादी. तेव्हा आपण केलेली अॅडजेस्टमेंट आवडली नाही तर परत अन डू करून मागे येणे किंवा हिस्ट्री पॅलेट वापरणे हे दोन पर्याय आपल्यापुढे असतात. पण काही वेळेस ओरिजनल इमेज डिस्टॉर्ट होते आणि किंवा हिस्ट्री पॅलेट रिसेट होते. ज्यावेळी आपण न्यू अॅडजेस्टमेंट लेअर ऑप्शन सिलेक्ट करतो तेव्हा इमेज >अॅडजेस्टमेंट या ऑप्शनच्या खाली येणाऱ्या सर्व अॅडजेस्टमेंटॆस या लेअरवर केल्या जातात आणि ओरिजनल इमेज इन्टॅक्ट राहते. ही माहिती अगदी थोडक्यात हा ऑप्शन काय आहे हे कळण्यापूरती आहे. या विषयाव्रर स्वतंत्र पोस्ट होऊ शकते. पुढे कधीतरी या ऑप्शनचा अभ्यास करूयात.
क्रिएट न्यू सेट- काही वेळेला एखाद्या डिझाइन मध्ये इतके लेअर्स होतात की ते मॅनेज करता येणं कठीण होऊन बसतं. याठिकाणी या ऑप्शनचा वपार करून तुम्ही तुमचे लेअर्स हे वेगवेगळ्या फोल्डर्स मध्ये ऑर्गनाईज करू शकता.
लेअर मास्क- हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही सिलेक्टेड लेअरवर त्यालेअरवरील ओरिजनल इमेजला धक्का न लावता पेन्ट करू शकता.
लेअर स्टाईल्स - या ऑप्शनमध्ये असलेले विविध इफेक्ट तुम्ही सिलेक्टेड लेअरला अॅप्लाय करू शकता.
ही झाली लेअर्स पॅलेटची फिचर्स. प्रत्यक्ष वापरून बघितल्याशिवाय ती लक्षात राहणार नाहीत. तेव्हा ही फिचर्स जरूर वापरून बघा.
भेटूयात परत पुढच्या पोस्टच्यावेळी... आणि हो.. कॉमेंट करायला विसरू नका.
kiran.velhankar@gmail.com
No comments:
Post a Comment