आज आपण च आणि ज या दोन मुळाक्षरांची वळणे बघू.या दोन्ही मुळाक्षरांच्या वळणांमध्येही वर्तुळखंडाचा (अर्धवर्तुळ) प्रामुख्याने जाणवतो. करा तर मग सुरू.... पण हो, आधीच्या मुळाक्षरांचा सराव चालू आहे ना? सराव मध्येच सोडू नका. नियमितपणे योग्य तो सराव या एकाच मार्गाने तुम्ही देवनागरीच्याच काय कुठल्याही कॅलिग्राफित मास्टर व्हाल. पण त्यासाठी नियमितपणे सरावाला पर्याय नाही. No shortcuts please... ! आता बौद्धिक फार झालं ना? घ्या तुमचा चार्टपेपर आणी करा सराव च आणि ज या मुळाक्षरांचा.
No comments:
Post a Comment