Friday, January 9, 2009

काचेवर किंवा मातीच्या भांड्यांवर अक्षरलेखन

नमस्कार मित्रांनो,

यावेळेला पोस्ट टाकायला जरा उशिरच झाला. नेहमीप्रमाणेच माफ करालच. असो, आज आपण काचेच्या किंवा मातीच्या भांडयांवर कसे अक्षरलेखन करायचे ते बघणार आहोत. काचेवर सुलेखन करण्यासाठी ग्लास लायनर किंवा ग्लास मार्करच्या मदतीने सुलेखन करून त्याच तुम्ही रंग भरू शकता. तसंच मातीच्या भांड्यांसाठी अॅक्रिलिक किंवा ऑईल पेंटचाही वापर करता येईल. खाली काचेच्या मग वर केलेले सुलेखन उदाहरणार्थ दिले आहे.  तुम्ही केलेले सुलेखन तुम्ही काच, तांब्याची प्लेट इत्यादींवर इचिंगही करता येईल. मात्र त्यासाठी इचिंगची व्यवस्थित माहिती पाहिजे. शेवटी काय तर, तुम्ही कराल तितके प्रयोग कमी आहेत. फक्त कल्पनाशक्ती पाहिजे बघा.


Thanks Prabhakar
for more info: prabhakar.bhosale@gmail.com

2 comments:

Harshal said...

वा सर ! मस्तच !!! नक्की करून बघतो .... मी पण थोडा प्रयत्न केलाय...
corel painter मधे ... छान सॉफ्टवेर आहे.
Please visit my blog www.mibajirao.blogspot.com
कसा वाटला सांगा माझा प्रयत्न ? Please Advice.

Jaswandi said...

तुमचा ब्लॉग खुप छान आहे. वाचणा-याला आपण समोर बसुन तुमच्याकडुन खरं खरं शिकतो आहोत असं वाटतं! तुमचा ब्लॉग वाचल्यावर लहान असताना कधीतरी एका वर्कशॉपच्यावेळी घेतलेलं किट बाहेर काढुन practice ला सुरुवात केली. :)
thank you