Designs Made Easy...

नमस्कार मित्रांनो, आपण सर्व डिझायनर जाणताच की फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि इनडिझाईन या सारख्या डिझाईन सॉफ्टवेअर्सला पयार्य नाही. आणि कितीही शिकलं तरी यातील बारकावे, काही सोप्या पद्धती हे पण माहिती असणं गरजेचं आहे. याच काही टिप्स, ट्रिक्स आणि आवश्यक माहिती यांसाठी हा ब्लॉग. आणि हो कदाचित या गोष्टी परिपूर्ण असतीलच असं नाही. काही चुकत असेल तर जरूर कळवा.
नमस्कार मित्रांनो,

आजची पोस्ट ही मराठी अक्षरलेखन या विषयाची शेवटची पोस्ट. आतापर्यंत आपण अक्षरलेखनाचे विविध प्रकार बघितले. पण आता आज जो प्रकार आपण बघणार हा त्या सगळ्यांतला अवघड प्रकार आहे. तो म्हणजे विषयानुरूप अक्षरलेखन. नुसते एखाद्याचे नाव लिहिणे किंवा देवनागरीमध्ये एखादा श्लोक लिहिणे फारसे अवघड नाही. मात्र विषयाला, एखाद्या शब्दाच्या अर्थानुसार अक्षरलेखन करणे फारच अवघड आहे. त्यासाठी अक्षरलेखनाची तपस्याच करावी लागते. थोडक्यात खूपच प्रॅक्टीसची गरज असते. आपण उदाहरण घेऊ. समजा तुम्हाला सम्राज्ञी या शब्दाचे अक्षरलेखन करायचे असेल तर कसे कराल? किंवा छुम छुम पावसा ही ओळ तुम्हाला अक्षरलेखनात करायची वेळ आली तर? 
खाली केलेले अक्षरलेखन बघा. म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्षात येईल.Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com


नमस्कार मित्रांनो,

आज आपण सुलेखनाचा थोडा वेगळ्या प्रकारे वापर बघणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घराच्या दारावर नेमप्लेट ही असतेच. हीच नेमप्लेट जर तुम्ही सुलेखन वापरून केलीत तर ती इतर नेमप्लेट्स पेक्षा नक्की वेगळी आणी आकर्षक होईल. त्याचप्रमाणे घरातल्या भिंतीवरही तुम्ही याप्रकारे सुलेखन करू शकता.  तुम्ही केलेल्या अक्षरलेखन हे बाजारमध्ये लाकूड किंवा धातूच्या पट्ट्यांवर कोरून मिळते. खाली उदाहरणार्थ एक नेमप्लेटट चे डिझाईन देलेले आहे. हे अक्षरलेखन माझा मित्र प्रभाकर याने इलस्ट्रेटर मध्ये केलेले आहे.


Thanks Prabhakar
for more info: prabhakar.bhosale@gmail.com

नमस्कार मित्रांनो, 

सर्वप्रथन बरेच दिवस नवीन पोस्ट न लिहिल्याबद्दल माफी मागतो. पण काय करणार, कामाचा ताण सध्या जरा जास्त आहे. त्यामुळे नवीन पोस्ट लिहिणं शक्य होत नाहीये.  तरी लवकरात लवकर नवं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न आहे. समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.

लवकरच परत भेटू.
किरण.

नमस्कार मित्रांनो,

यावेळेला पोस्ट टाकायला जरा उशिरच झाला. नेहमीप्रमाणेच माफ करालच. असो, आज आपण काचेच्या किंवा मातीच्या भांडयांवर कसे अक्षरलेखन करायचे ते बघणार आहोत. काचेवर सुलेखन करण्यासाठी ग्लास लायनर किंवा ग्लास मार्करच्या मदतीने सुलेखन करून त्याच तुम्ही रंग भरू शकता. तसंच मातीच्या भांड्यांसाठी अॅक्रिलिक किंवा ऑईल पेंटचाही वापर करता येईल. खाली काचेच्या मग वर केलेले सुलेखन उदाहरणार्थ दिले आहे.  तुम्ही केलेले सुलेखन तुम्ही काच, तांब्याची प्लेट इत्यादींवर इचिंगही करता येईल. मात्र त्यासाठी इचिंगची व्यवस्थित माहिती पाहिजे. शेवटी काय तर, तुम्ही कराल तितके प्रयोग कमी आहेत. फक्त कल्पनाशक्ती पाहिजे बघा.


Thanks Prabhakar
for more info: prabhakar.bhosale@gmail.com


नमस्कार मित्रांनो,

आज आपण कापडावर कोणत्या प्रकारे सुलेखन करता येते ते बघू.  कापडावर सुलेखन करण्यासाठी फॅब्रिक कलर्स किंवा फेव्हिक्रिल कलर्सचा वापक करावा लागतो. हे रंग बाजारात सहज उपलब्ध होतात. मात्र एकदा का रंगाचा वापर केला की तो रंग पुसता येत नाही. त्यामुळे तुम्ही टि शर्टवर किंवा टॉप वर अक्षरलेखन करत असाल तर जरा काळजीपूर्वक करा. टिशर्ट, टॉप, ओढणी, जीन्स, पडदे, बेडशीट, अभ्रे इत्यादी कशावरही तुम्ही अक्षरलेखन करू शकता. खालील आकृतीवरून टी शर्ट किंवा टॉपवर कोणत्या प्रकारची कॅलिग्राफी करता येते ते दाखवले आहे.


Thanks Prabhkar
prabhakar.bhosale@gmail.comनमस्कार मित्रांनो,

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

किरण वेल्हाणकर

नमस्कार दोस्तांनो,
आजपर्यंत आपण सुलेखन कसे करायचे, अक्षरांची वळणे कशी, साधने कोणती , इत्यादी गोष्टींची माहिती घेतली. आजपासून आपण कोणकोणत्या पृष्ठभागांवर आपण सुलेखन ककरू शकतो याची माहिती घेऊ. त्याचबरोबर यासाठी कोणत्या रंगांचा वापर करता येतो याचीही माहीती घेऊ. हातकागद, कापड, काच, मातीची भांडी, दारावरची नावाची पाटी इत्यादी विविध पृष्ठभागांवर सुलेखन होऊ शकते. 
आज आपण हातकागदावर कशा प्रकारे सुलेखन करता येते ते बघू. 
हातकागदावर सुलेखन करताना प्रामुख्याने शाईचाच वापर करावा लागतो.  फोटोइंक्स किंवा वॉटरप्रुफ इंक्सही वापरता येतात. हातकागदावर सुलेखन करताना त्याचा विशिष्ठ पोताचा वापर करून घेऊन उत्तम सुलेखन करता येते. खाली दिलेली आकृती बघा. याप्रकारे विविध रंगात सुलेखन करून त्याची फ्रेम करून घरात भिंतीवरही लाऊ शकता. फक्त तुम्ही कसा विचार करता यावर ते अवलंबून आहे.

Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com

Subscribe to: Posts (Atom)