Friday, October 31, 2008

मुळाक्षरे श आणि ग

नमस्कार मित्रांनो,

सराव सुरू आहे ना? आज आपण देवनागरीच्या पुढच्या दोन अक्षरांची वळणे बघणार आहोत. ही अक्षरे आहेत श आणि ग. या दोन्ही अक्षरांच्या रचनेत गाठींचा वापर करावा लागतो. या गाठींच्या आणि अक्षरांच्या वळणांचा नीट अभ्यास करा आणि चार्टपेपरवर त्याचा सरवा करा.




Thanks Prabhakar,
For more info... prabhakar.bhosale@gmail.com

Thursday, October 30, 2008

मुळाक्षरे व, ब आणि क

नमस्कार मित्रांनो,

चला दिवाळीची सुटी संपली. आता परत कामाला सुरवात.. यावेळी आता आधी देवनागरी अक्षरलेखनातली उरलेल्या  अक्षरांची वळणे आधी संपवू आणि मग दुसऱ्या विषयाकडे वळू म्हणजे एक विषय पूर्ण होईल. 

आज आपण व, ब आणि क या तिन मुळाक्षरांची वळणे बघणार आहोत. या  मुळाक्षरांच्या वळणांतही द आणि न या मुळाक्षरांप्रमाणेच वर्तुळखंडांचा (अर्धवर्तुळ) वापर आढळतो. पुन्हा एकदा मागील सर्व सूचना इथेही लागू. खालची आकृती बघा आणि सरावाला सुरवात करा.


Tuesday, October 28, 2008

पुन्हा भेटूयात 30 तारखेपासून..

नमस्कार मित्रांनो...

दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आजची पोस्ट फक्त तुम्हा आठवण करून देण्यासाठी. 30 तारखेपासून पुन्हा लिखाणाला सुरवात करणार आहे. भेट द्यायला विसरू नका. 

भेटूयात तर मग 30 ऑक्टोबरपासून.... दररोज..

किरण वेल्हाणकर

Saturday, October 25, 2008

नमस्कार मित्रांनो...

नमस्कार,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हादिर्क शुभेच्छा!दिवाळीच्या कामामुळे पोस्ट टाकायला वेळ मिळत नाहीये. आता पुन्हा दिवाळीनंतर भेटू.तोपर्यंत आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि त्यासंबंधीत ब्लॉगला ही.. ..

http://www.esakal.com/diwali08/index.html

http://insidebeehive.blogspot.com

पुन्हा एकादा दिवाळीच्या शुभेच्छा....

भेटूयात दिवाळीनंतर..

किरण

Monday, October 20, 2008

Adding intrest to a photograph...

नमस्कार मित्रांनो,
आज एक छोटंसं ट्युटोरियल बघुयात. एखाद्या फोटोला अधिक इंटरेस्टींग करण्यासाठीची ही एक छोटीशी ट्रिक. याचा वापर डिझायनिंग  प्रोजेक्टसाठी फार चांगल्या पद्धतीने करता येतो. खाली दाखविल्याप्रमाणे इफेक्ट कसा द्यायचा हे आपण आज बघूयात.

1 ) खाली दाखविल्याप्रमाणे एखादा फोटो सिलेक्ट करा.

2) त्यातील एका व्यक्तीच्या चेहेऱ्याभोवती सिलेक्शन टूल वापरून हवा तेवढा एरिया सिलेक्ट करा.

3) सिलेक्शन कॉपी करून नवीन लेअरवर पेस्ट करा.
4) सिलेक्ट मेन्यूतील ट्रान्सफॉर्म सिलेक्शन हा सबमेन्यू सिलेक्ट करा.

5)सिलेक्शनचे कंट्रोलींग नोड्स वापरून सिलेक्शन हवे तसे रोटेट करून घ्या.


लेअर पॅलेट मध्ये खालीलप्रमाणे लेअर्स दिसतील.


आता लेअर स्टाईल्स डायलॉगबॉक्स ओपन करा. त्यातील ड्रॉप शॅडो इफेक्ट सिलेक्ट करून खालीलप्रमाणे सेटींग्ज करा. (तुम्ही सिलेक्ट केलेल्या फोटोग्राफनुसार ही सेटींग्ज वेगवेगळी असू शकतील)


वर दिलेल्या सगळ्या स्टेप्स फोटोग्राफमधील दुसरा चेहरा सिलेक्ट करून त्यालासुद्धा अॅप्लाय करा. (खालील छायाचित्राप्रमाणे इफेक्ट दिसायला लागेल.) आता मुळ फोटोग्राफचा लेअर सिलेक्ट करा. आता लेअर पॅलेटवरील न्यू अॅडजेस्टमेंट लेअर या आयकॉनवर क्लिक करून त्यातील ह्यू अॅन्ड सॅच्यूरेशन हा ऑप्शन सिलेक्ट करा. ओपन झालेल्या डायलॉग बॉक्स मधील सॅच्यूरेशनचा स्लायडर 0 वर आणा. म्हणजे आपण तयार केलेले ड्रॉपशॅडोचे लेअर्स वगळता मुळ छायाचित्र ब्लॅक अॅन्ड व्हाईट होईल. (या ठिकाणी ब्लॅक अॅन्ड व्हाईट एेवजी तुम्ही इतर इफेक्ट ही वापरू शकता.) 


ब्रोशर डिझायनिंगच्या वेळी अनेक वेळा हा इफेक्ट वापरता येतो. तुम्हालाही असे काही सोपे इफेक्ट माहित असतील तर जरूर कळवा.
kiran.velhankar@gmail.com

Sunday, October 19, 2008

नमस्कार मित्रांनो....

आज पोस्ट नाही. फकत एक निरोप आणि विनंती...
ऑफिसमध्ये दिवाळीमुळे कामाचा लोड फारच वाढलाय. त्यामुळे दररोज पोस्ट टाकता येणं शक्य होत नाहीये. तरीही वेळात वेळ काढून पोस्ट टाकण्याचा प्रयत्न आहेच. अडचण समजून घ्याल याबद्दल खात्री आहे. ब्लॉगला भेट द्यायला मात्र विसरू नका. २-३ दिवसात परत नक्की भेटू. आणि हो.. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या अॅडव्हान्स शुभेच्छा !

- तुमचा मित्र
किरण वेल्हाणकर
kiran.velhankar@gmail.com

Saturday, October 18, 2008

मुळाक्षरेः द, न

नमस्कार मित्रांनो,

आज आपण द आणि न ही दोन मुळाक्षरांची वळणे बघणार आहोत. या दोन मुळाक्षरांच्या वळणांतही च आणि ज या मुळाक्षरांप्रमाणेच वर्तुळखंडांचा (अर्धवर्तुळ) वापर आढळतो. त्यामुळे मागच्या पोस्टमध्ये केलेल्या सर्व सूचना या पोस्टलाही लागू.  त्यामुळे आज जास्त काही लिहिण्यासारखं नाही. खालची आकृती बघा आणि सरावाला सुरवात करा.


Thanks Prabhakar
for info: prabhakar.bhosale@gmail.com

Friday, October 17, 2008

लेअर्स पॅलेटची फिचर्स

नमस्कार मित्रांनो,
मागच्या पोस्टमध्ये आपण लेअर्स पॅलेटची माहिती घेतली. आता आज आपण लेअर्सच्या फिचर्सची माहिती घेणार आहोत.
खाली दिलेली आकृती बघा. 


लेअर ओपॅसिटी - याद्वारे आपण लेअरची ट्रान्स्परन्सी कंट्रोल करतो. 0 % म्हणजे पूर्ण ट्रान्स्परन्ट आणि 100% म्हणजे पूर्ण ओपेक.

लॉक ऑल-  या चेक बॉक्स वर क्लिक केल्यावर (एनेबल केल्यावर) सिलेक्टेड लेअर् लॉक होतो. म्हणजेच आता तुम्ही कोणत्याही प्रकारचं एडिटींग करू शकत नाही.
 
लॉक पोझिशन- हा चेकबॉक्स क्लिक केल्यावर तुम्ही या लेअरवरील इमेजचे एडिटींग करू शकता पण या इमेजची पोझिशन (x, y) बदलू शकत नाही.

लॉक इमेज पिक्सेल्स-  हा चेकबॉक्स एनेबल केल्यावर  तुम्ही या लेअर वर कुठल्याही प्रकारचे ड्रॉइंग करू शकत नाही.

लॉक ट्रान्स्परन्ट- हा चेकबॉक्स एनेबल केल्यावर लेअरवरील ट्रान्स्परन्ट भाग वगळून इतर भागावर तुम्ही ड्रॉईंग करू शकता. ट्रान्स्परन्ट भाग लॉक असल्यामुळे त्याच्यावर ड्रॉइंग करता येत नाही.

डिलीट- या आयकॉनवर क्लिक केल्यावर सिलेक्टेड लेअर डिलीट होतो (इफेक्टसह). या व्यतिरिक्त सिलेक्टेड लेअर ओढून या आयकॉनवर आणून सोडलात तरी तो लेअर डिलीट होतो. 

न्यू लेअर - या आयकॉनवर क्लिक केल्यावर नवीन ब्लॅंक लेअर तयार होतो. किंवा एखाद्या आधीच्या  लेअरचा थंबनेल जर या आयकॉनवर ओढून आणून सोडलात तर त्या लेअर चा डुप्लिकेट लेअर तयार होतो.

न्यू अॅडजेस्टमेंट लेअर-  हा ऑप्शन फार महत्त्वाचा आहे. आपण ज्यावेळी एखादी इमेज अॅडजेस्ट करतो, म्हणजे ब्राईटनेस, कॉन्स्ट्रास्ट, ह्यू, सॅच्यूरेशन इत्यादी.  तेव्हा आपण केलेली अॅडजेस्टमेंट आवडली नाही तर परत अन डू करून मागे येणे किंवा हिस्ट्री पॅलेट वापरणे हे दोन पर्याय आपल्यापुढे असतात. पण काही वेळेस ओरिजनल इमेज डिस्टॉर्ट होते आणि किंवा हिस्ट्री पॅलेट रिसेट होते. ज्यावेळी आपण न्यू अॅडजेस्टमेंट लेअर ऑप्शन सिलेक्ट करतो तेव्हा इमेज >अॅडजेस्टमेंट या ऑप्शनच्या खाली येणाऱ्या सर्व अॅडजेस्टमेंटॆस या लेअरवर केल्या जातात आणि ओरिजनल इमेज इन्टॅक्ट राहते. ही माहिती अगदी थोडक्यात हा ऑप्शन काय आहे हे कळण्यापूरती आहे. या विषयाव्रर स्वतंत्र पोस्ट होऊ शकते. पुढे कधीतरी या ऑप्शनचा अभ्यास करूयात.

क्रिएट न्यू सेट-  काही वेळेला एखाद्या डिझाइन मध्ये इतके लेअर्स होतात की ते मॅनेज करता येणं कठीण होऊन बसतं. याठिकाणी या ऑप्शनचा वपार करून तुम्ही तुमचे लेअर्स हे वेगवेगळ्या फोल्डर्स मध्ये ऑर्गनाईज करू शकता.

लेअर मास्क- हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही सिलेक्टेड लेअरवर त्यालेअरवरील ओरिजनल इमेजला धक्का न लावता पेन्ट करू शकता.

लेअर स्टाईल्स - या ऑप्शनमध्ये असलेले विविध इफेक्ट तुम्ही सिलेक्टेड लेअरला अॅप्लाय करू शकता.

ही झाली लेअर्स पॅलेटची फिचर्स. प्रत्यक्ष वापरून बघितल्याशिवाय ती लक्षात राहणार नाहीत. तेव्हा ही फिचर्स जरूर वापरून बघा.
भेटूयात परत पुढच्या पोस्टच्यावेळी... आणि हो.. कॉमेंट करायला विसरू नका.

kiran.velhankar@gmail.com

Thursday, October 16, 2008

मुळाक्षरे- च, ज

नमस्कार मित्रांनो,
 आज आपण च आणि ज या दोन मुळाक्षरांची वळणे बघू.या दोन्ही मुळाक्षरांच्या वळणांमध्येही वर्तुळखंडाचा (अर्धवर्तुळ) प्रामुख्याने जाणवतो. करा तर मग सुरू.... पण हो, आधीच्या मुळाक्षरांचा सराव चालू आहे ना? सराव मध्येच सोडू नका. नियमितपणे योग्य तो सराव या एकाच मार्गाने तुम्ही देवनागरीच्याच काय कुठल्याही कॅलिग्राफित मास्टर व्हाल. पण त्यासाठी नियमितपणे सरावाला पर्याय नाही. No shortcuts please... !  आता बौद्धिक फार झालं ना? घ्या तुमचा चार्टपेपर आणी करा सराव च आणि ज या मुळाक्षरांचा. 


Wednesday, October 15, 2008

लेअर्स पॅलेट

नमस्कार मित्रांनो, 
कसे आहात?
या आधीच्या फोटशॉप बेसिक्सच्या पोस्टमध्ये आपण लेअर्सची माहिती घेतली. आज आपण हे लेअर्स कंट्रोल करणाऱ्या लेअर्स पॅलेटची माहिती घेऊ. आधी खाली दिलेली लेअर्स पॅलेटची इमेज बघा (shortkey F7). मग आपण त्यातल्या विविध भागांची माहिती घेऊ.




नॉर्मल लेअर ः या लेअरवर तुमची इमेज स्टोअर केलेली असते.
लेअर इफेक्ट्स किंवा स्टाईल ः  तुम्ही तुमच्या लेअरवरील इमेजला काही स्पेशल इफेक्ट्स ही अॅड करू शकता. हे जे इफ्केट्स किंवा स्टाईल्स असतात हे या स्टाईल लेअरवर स्टोअर असतात. इमेजला इफेक्ट दिलेला असेल तर या लेअरवर f (स्मॉल एफ) ते साईन दिसते. याठिकाणी तुम्ही कितीही इफेक्ट अॅड करू शकता. तुम्ही ज्या क्रमाने इफेक्ट द्याल. त्याक्रमाने हे इफेक्ट्स  एकाखाली एक क्रमाने दिसतात.  आत्ता याठिकाणी ड्रॉप शॅडो हा इफेक्ट अॅप्लाय केलेला दिसतो आहे.

टाईप लेअर ः हा लेअर इमेज लेअरप्रमाणेच काम करतो. फक्त या ठिकाणी इमेजच्या एेवजी टेकस्ट असते. (तुम्ही ठिकाणी कॅरेक्टर, कलर, साईज, रंग इत्यादी गोष्टी एडिट करू शकता.)

बॅकग्राउंड लेअर ः हा लेअर कायम लॉक असतो. तुम्ही त्याची पोझिशन बदलू शकत नाही किंवा याला कोणताही इफेक्ट देता येत नाही. हा लॉक लेअर हा त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या छोट्याश्या कुलपाच्या चिन्हाने ओळखता येतो. या लेअरच्या थंबनेलवर डबलक्लिक केल्यास हा बॅकग्राऊंड लेअर नॉमर्ल लेअर मध्ये बदलला जातो.

शो / हाईड आयकॉनः लेअरच्या सुरवातीला जर तुम्हाला डोळ्याचे चिन्ह दिसत असेल तर हा लेअर व्हिजिबल असतो. हे डोळ्याचे चिन्ह म्हणजे शो/हाईड आयकॉन होय. या डोळ्याच्या चिन्हावर जर तुम्ही क्लिक केलेत तर तो लेअर त्याच्या जागेवरच असेल , मात्र त्या लेअरवरील कन्टेन्ट (इमेज)  दिसणार नाही.

ही झाली लेअर्स विंडोची माहिती. पुढच्या पोस्टमध्ये लेअर्स पॅलेटच्या फिचर्सची माहिती घेऊ.
पोस्ट आवडली असेल तर जरूर कॉमेंट करा. आवडली नसेल तर काय सुधारणा पाहिजे ते कॉमेंट करून कळवा.
kiran.velhankar@gmail.com 

Tuesday, October 14, 2008

उत्तम लोगो तयार करण्यासाठी...


नमस्कार मित्रांनो,

आजचा विषय थोडा वेगळा आहे. इंटरनेटवर सर्फींग करताना लोगो डिझाईनवरचा हा लेख वाचण्यात आला. त्यातले मुद्दे तुमच्यापुढे मांडतोय.

आपण सगळे डिझायनर्स विविध प्रकारचे लोगो बघतो, करतो. पण असा एखादाच लोगो असतो की जो मनाला भावतो. नकळत आपल्या तोंडून शब्द बाहेर पडतात, ``आईला, 1 नंबर लोगो आहे''.  हा लोगो 1 नंबर उगाचच होत नाही त्यामागे कोणीतरी केलेला अभ्यास आणि विचार असतो. असा हा 1 नंबर लोगो क्रिएट करायचा तर तो खाली सांगीतल्याप्रमाणे असला पाहिजे.

1.) या लोगोमागे काहीतरी विचार, अभ्यास असला पाहिजे. आणि तो विचार सांगता आला पाहिजे. (It must be describable)
2.) हा लोगो लक्षात राहण्याजोगा पाहिजे. (It must be memorable)
3.) हा लोगो रंगाशिवाय इफेक्टिव असला पाहिजे.  (It must be effective without colour)
4.) आणि हा लोगो विविध आकारात स्केलेबल असला पाहिजे. म्हणजे 1 सेंटीमीटर पासून 1 फूटापर्यंत कितीही आकारात व्हिजिबल असला पाहिजे.

यापैकी पहिला आणि दुसरा पॉईंट एकमेकांशी संबंधित आहेत.  जर तुम्ही लोगो तयार करताना त्यामागे काही विचारच नसेल तर तो समजावून सांगणार कसा? आणि तुम्ही तो सांगू शकला नाहीत तर तो लक्षात तरी कसा राहणार?

तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण याठिकाणी आकार हा महत्त्वाचा आहे. रंग हा दूय्यम आहे. लोगो डिझाईन करताना रंगाचा वापर हा सगळ्यात शेवटी करावा. कारण तुम्ही तयार केलेला लोगो जर ब्लॅक व्हाईट मध्ये इफेक्टिव नसेल तर कुठलाही रंग वापरून हा लोगो इफेक्टिव्ह होणार  नाही.

चौथा मुद्दा हा बरेच डिझायनर्स लक्षात घ्यायला विसरतात. तुम्ही केलेला लोगो पेनापासून होर्डिंगपर्यंत कुठेही वापरता आला पाहिजे. आणि त्याची व्हिजिबिलीटी ही तेवढीच राहिली पाहिजे.

खाली दिलेला लोगो पाहा. आपण वर बघितलेल्या मुद्द्यांचा विचर करून केलेला हा लोगो आहे. य़ुके तल्या डिस्टंन्स लर्निंगसाठीच्या ओपन युनिव्हर्सिटीचा आहे.  ओपन युनिव्हर्सिटी या कन्सेप्टचा अतिशय प्रभावी वापर इथे केलेला आढळतो (यु मध्ये ओपन ओ). आणि विशेष म्हणजे हा लोगो आधी सांगितल्याप्रमाणे पेनापासून होर्डिंगपर्यंत कुठेही वापरला जाऊ शकतो.






असा हा memorable, scalable, describable, reproducable लोगो इतर लोगोंपेक्षा वेगळा उठून दिसतो.

kiran.velhankar@gmail.com
   

Monday, October 13, 2008

मुळाक्षरे : ड इ ई झ

नमस्कार मित्रांनो,
आज आपण ड. इ आणि इ ही अक्षरे कशी काढायची ते बघू.
ड, इ आणि ई या मुळाक्षरातील मुळवळणे हि सारखीच आहेत. ई वरील रफार हा शिरोरेषेच्या तीन पट असावा तसेच इ च्या गाठीतून निघणारी तिरपी रेषा ही शिरोरेषेच्या दोन पट असावी. खालील आकृतीवरून ते आपल्या लक्षात येईल. बाणांच्या वळणानुसार ग्राफपेपरवर भरपूर सराव करा. आणि हो आधी झालेल्या मुळाक्षरांचाही सराव करायला विसरू नका.



Thanks Prabhakar.
prabhakar.bhosale@gmail.com

Sunday, October 12, 2008

फोटोशॉप लेअर्स-1

नमस्कार मित्रांनो,
आजपासून आपण फोटोशॉपच्या लेअर्सची माहिती घेणार आहोत. नव्यानी फोटोशॉप शिकणाऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. लेअर्स ही कन्सेप्ट फोटोशॉप 3.0 पासून सुरू झाली आणि या लेअर्सनी फोटोशॉपमध्ये क्रांती घडवली. फोटोशॉपच्या सगळ्यात पॉवरफूल फिचर्सपैकी एक म्हणजे लेअर्स. आज लेअर्सशिवाय फोटोशॉपमध्ये डिझाइनींग करण्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही.
लेअर्सचा वापर खूप प्रकारे आणि विविध गोष्टींसाठी करता येतो. पण त्यासाठी लेअर्सवर मास्टरी येणे गरजेचे आहे आणि त्यासाठी थोडा वेळ लागेल. चला तर मग आता लेअर्सची माहिती घेऊ.
लेअर्स म्हणजे काय?
अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, लेअर्स म्हणजे फोटोशॉपमध्ये एकावर एक ठेवलेल्या इमेज. या सगळ्या इमेज मिळून एक इमेज तयार होते. यातल्या प्रत्येक इमेजवर तुम्ही इतर इमेजेस खराब न करता स्वतंत्रपणे काम करू शकता.
उदाहरणार्थ... मी एका कागदावर लाल रंगाचा एक चौकोन काढला. त्याच्यावर एक ट्रान्स्परंट पेपर ठेऊन त्याच्यावर एक पिवळा गोल काढला. परत त्याच्यावर एक ट्रान्स्परंट पेपर ठेऊन त्याच्यावर निळ्या रंगात काही अक्षरे लिहीली. हे पेपर्स म्हणजेच लेअर्स. सगळ्यात खालचा लाल चौकोन ही माझी बॅकग्राऊंड इमेज झाली (लेअर क्र.1 ). त्यावर असलेला पिवळा गोल म्हणजे एक स्वतंत्र लेअर झाला (लेअर क्र. 2). आणि सगळ्यात वरची अक्षरे हा आणखी एक स्वतंत्र लेअर झाला  (लेअर क्र.3). आता हे लेअर्स तुम्ही स्वतंत्रपणे एडिट करू शकता. त्यांना खालीवर करू शकता. ही कन्सेप्ट म्हणजेच लेअर्स. आहे की नाही सोपं. (आकृती बघा).


पुढच्या पोस्टमध्ये हे लेअर्स कंट्रोल करणाऱ्या फोटोशॉपच्या लेअर्स पॅलेटची माहिती घेऊ.
kiran.velhankar@gmail.com

Saturday, October 11, 2008

चार जीबींचे ‘पार्सल’

नमस्कार मित्रांनो,
आजची ही पोस्ट फारच भन्नाट आहे. आपल्याला सगळ्यांनाच हेवी डिझाइनच्या फाईल्स ऑनलाईन पाठवताना अनेक अडचणी येतात. पण जर तुम्ही चक्क 4 GB ची फाईल ऑनलाईन पाठवू शकलात तर... आहे की नाही कमाल.. आजची हि पोस्ट माझा मित्र अमीतच्या सौजन्याने...
मोठ्या आकाराच्या फाईल्स पाठवण्यासाठी साध्या ई-मेल सेवा याबाबतीत अगदीच कुचकामी ठरतात. त्यातून तुम्ही फार-फार तर २० ते २५ एमबी क्षमतेच्या फाईल्स पाठवू शकता. पण काहीवेळा आपल्याला १ जीबीहून अधिक क्षमतेच्या फाईल्स पाठवाव्या लागतात, उदा. एखादे मोठे डिझाईन, व्हिडिओ फुटेज, मूव्ही फाईल किंवा बॅक-अप डेटा. तेव्हा कामाला येणारी एक सेवा म्हणजे सिव्हिल नेटीझन. 

सिव्हिल नेटीझन हा एक डेस्कटॉप क्लाएंट आहे. पण हा इतका शक्तीशाली आहे की याचा वापर करून तुम्ही तब्बल चार जीबी क्षमतेच्या फाईल्सही लीलया ट्रान्स्फर करू शकता. विंडोज आणि मॅकिन्तोश या अॉपरेटिंग सिस्टिम्ससाठी सिव्हिल नेटीझन क्लाएंट उपलब्ध आहे. यातील पार्सल ही संकल्पना भन्नाट आहे. फाईल पाठवताना अट फक्त एकच...तुम्ही ज्याला ती पाठवणार आहात त्याच्याकडेही सिव्हिल नेटीझन क्लाएंट असणं आवश्यक आहे. सिव्हिल नेटीझन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. सिव्हिल नेटीझन इन्स्टॉल केल्यानंतर केवळ दोन स्टेप्समध्ये आपण फाईल पाठवू शकतो आणि केवळ एका स्टेपपमध्ये समोरचा ती डाऊनलोड करू शकतो. सिव्हिल नेटीझन क्लाएंट ओपन केल्यानंतर पुढील स्टेप्स फॉलो कराः 

पॅकः
 तुम्हाला जी फाईल पाठवायची आहे ती सिलेक्ट करा. तुमच्या पार्सलला नाव द्या आणि पॅकेज पार्सल म्हणा 

सेन्डः
 तुम्ही डेस्कटॉप मेल क्लाएंट (आऊटलूक, अॅपल मेल) किंवा इतर मेल सेवा (जी-मेल, याहू, रेडिफ इ.) वापरून समोरच्या व्यक्तीस पार्सल स्लिप पाठवू शकता. पार्सल स्लिप म्हणजे एन्क्रिप्ट केलेले टेक्स्ट मॅटर असते. हे जसेच्या तसे कॉपी करून समोरच्या व्यक्तील मेलद्वारे पाठवायचे. 

पिक-अप अॅण्ड अनपॅकः
 समोरच्या व्यक्तीने ही स्लिप त्याच्याकडे असणाऱ्या सिव्हिल नेटीझनच्या पिक-अप बॉक्समध्ये पेस्ट केले की डाऊनलोड पार्सल लिंक अॅक्टिव्हेट होईल. 
ट्रॅकः आपण आतापर्यंत पाठवलेले पार्सल्स, समोरच्या व्यक्तीने डाऊनलोड केलेले पार्सल याचा संपूर्ण ट्रॅक आपण ठेवू शकतो. 


मी आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्या सेवांमध्ये ही सवर्वांत अत्याधुनिक आणि सुरक्षित सेवा आहे. तुम्हीही हे सेवा ट्राय करू शकता. तुम्हाला जर तुलनेने कमी हेवी फाईल्स पाठवायच्या असतील तर तुम्ही इतर सेवांचा वापर करू शकता. 


Friday, October 10, 2008

इन्फोग्राफिक्‍स-3 (5W1h)

नमस्कार दोस्तांनो,

इन्फोग्राफिक्‍स म्हणजे काय? आणि त्याचा वापर कशासाठी आणि कुठे होतो हे आपण याआधीच्या दोन पोस्ट्‌स मध्ये बघितले. आता प्रत्यक्ष इन्फोग्राफिक्‍स करायचं कसं आणि ते करताना काय काळजी घ्यायची हे बघूयात. पण.... त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे. चांगलं इन्फोग्राफिक्‍स तयार करण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या बघण्यात आलेली इन्फोग्राफिक्‍स चांगली की वाईट हे कळालं तर ते जास्त चांगलं आहे. चांगलं इन्फोग्राफिक्‍स कसं ओळखायचं यासाठी जरा आपल्याला वृत्तपत्रविद्येच्या अभ्यासक्रमाचा आधार घेतला पाहिजे.

जर्नालिझमचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी कोणती यासाठी एक सुत्र शिकवलं जातं. ते म्हणजे 5w1h. आता तुम्ही म्हणाल की झालं परत झेंगट सुरू. पण हे अगदी सोप्पं आहे. हे 5W म्हणजे....

1) what ?

2) where?

3) when?

4) why?

5) who?

आणि 1h म्हणजे How?

एखादी बातमी लोकांना अगदी व्यवस्थित कधी कळते तर जेव्हा या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतात तेव्हाच. म्हणजेच त्या बातमीतून काय, कुठे, कधी, का, कोणी आणि कसं हे वाचताक्षणीच कळालं पाहिजे. हाच नियम चांगल्या इन्फोग्राफिकलाही लागू पडतो. आहे ना सोप्पं.

आता हे पुढे दिलेलं ग्राफिक बघा. न्यूजविकचे आर्ट डिरेक्टर कार्ल गुड यांनी हे केलेले आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष डिक चेनी हे शिकारीला गेले असताना त्यांनी चूकून त्यांच्या सहकाऱ्यावरच शॉटगन मधून गोळी झाडली. ही सगळी घटना कार्ल गुड यांनी इन्फोग्राफिकमधून दाखवली आहे. यात 5W1H अगदी योग्य प्रकारे वापरले आहे. हे ग्राफिक बघितवल्यावर वाचकाला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. फायनल इन्फोग्राफिक करण्याआधी कार्ल गुड यांनी त्यासाठी केलेले रफ स्केच पण सोबत दाखवत आहे. तुम्ही इन्फोग्राफिक करण्याआधी केलेले रफ स्केच आणि तुमचे फायनल ग्राफिक यात जर साम्य असेल तरच तुम्ही केलेले ग्राफिक परिपूर्ण होते. खाली दिलेले ग्राफिक त्यादृष्टीने नीट बघा.


Click on the Graphic to Enlarge.

Click on the Graphic to Enlarge.

चला तर मग आजपासून वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होणाऱ्या इन्फोग्राफिक्‍सची चिरफाड सुरू करा.

पुढच्या पोस्टमध्ये आपण इन्फोग्राफिक्‍सचे उद्दीष्ट्य काय? आणि इन्फोग्राफिक्‍सचे काही प्रकार जे आम्ही वापरतो यांची माहिती घेऊ. भेटू यात तर परत. इथेच लवकरच! तुम्हाला काही प्रश्‍न अथवा शंका असतील तर जरूर कळवा.

kiran.velhankar@gmail.com

Thursday, October 9, 2008

मुळाक्षरे : छ क्ष

नमस्कार मित्रांनो,
आज आपण पुढची दोन अक्षरे बघू.
छ आणि क्ष या मुळाक्षरातील गाठींचे निरक्षण करा.  बाणांच्या सहाय्याने त्याची वळणे दाखवली आहेत. त्या वळणांनुसार 8 ते 10 ग्राफपेपरवर सराव करा. छ मध्ये एक गाठ येते, तर क्ष मध्ये दोन गाठी येतात त्या दोन्ही गाठी वेगवेगळ्या आकाराच्या असतात. नीट निरीक्षण करा आणि सराव करा.

Wednesday, October 8, 2008

मुळाक्षरे : अ उ ऊ

नमस्कार मित्रांनो,
आजपासून आपण अक्षर अवयवांच्या वळणानुसार जे गट केले आहेत त्यानुसार ती मुळाक्षरे कशी काढायची हे बघू. मात्र यासाठी खूप सरावाची गरज आहे हे लक्षात ठेवा. नुसतं बघून हे होणारं नाही.  खालील आकृतीवरून मुळाक्षरे कशी काढायची हे लक्षात येईल. त्यानुसार 8 ते 10 ग्राफपेपर वर या मुळाक्षरांचा सराव करा.

Tuesday, October 7, 2008

मुळाक्षरे-1

नमस्कार मित्रांनो,
अक्षरअवयवांचा भरपूर सराव केल्यावर आता आपण मुळाक्षरांच्या वळणांचा अभ्यास करू.  अक्षरअवयवांच्या वळणानुसार मुळाक्षरांचे विविध गट करता येतील. सोबतच्या आकृतीत ते तुम्हाला लक्षात येईल. या गटांतील अक्षरांच्या वळणांचे आज फक्त निरक्षण करा उद्यापासून प्रत्यक्षात हि मुळाक्षरे कशी काढायची याची सविस्तर माहिती पाहू.

thanks Prbhakar
for more info: prabhakar.bhosale@gmail.com

Monday, October 6, 2008

ऑटो कॅडची फाईल कोरल मध्ये ओपन करताना... भाग 2

नमस्कार मित्रांनो,

ऑटो कॅडची फाईल कोरल मध्ये इम्पोर्ट करण्यासाठी काय करायचं हे आपण या आधीच्या पोस्ट मध्ये बघितलं. माझा एक आर्टिस्ट मित्र श्रीकांत यानी याच्या पुढची माहिती आपल्या सगळ्यांसाठी कळवली आहे. ही माहिती ऑटो कॅडच्या फाईलची कोरल मधून प्रिंट सोडण्यासंदर्भातील आहे. आणि महत्त्वाची तर नक्कीच आहे. ...
श्रीकांतनी कळवले आहे की, ऑटो कॅडची फाईल कोरलमध्ये इम्पोर्ट केल्यावर दिसताना छान दिसेल. त्याचा डिजिटल प्रिंटही छान येईल. नॉर्मल लेजर प्रिंटही छान येईल. पण.....
जर का या फाईल चे फोर कलर सेपरेशन करायचं म्हटलं तर पॉझिटीव्ह किंवा CTP करताना या डिझाईनमधील लाईन्स ऑफसेट प्रिंटींगला येत नाहीत.  त्यामुळे या लाईन्स कोरल मध्ये फाईल इम्पोर्ट केल्यावर .5 च्या करून घ्याव्यात.

मित्रांनो माझ्यासाठी ही माहिती नविनच आहे.  त्यामुळे Thanks to Shrikant.  तुमच्याकडेही अशी माहिती असल्यास मला जरूर कळवा. माझा इमेल आयडी... kiran.velhankar@gmail.com

Sunday, October 5, 2008

मात्रा आणि रफार

मात्रा शिरोरेषेच्या चारपट असावा आणि रफार तीन पट असावा. खाली दाखविल्या प्रमाणे किमान 8 ते 10 ग्राफपेपरवर अशा प्रकारचा सराव करावा.




उकार आणि वेलांटी

उकार आणि वेलांटी शिरोरेषेच्या चारपट असावी खाली दाखविल्या प्रमाणे किमान 8 ते 10 ग्राफपेपरवर अशा प्रकारचा सराव करावा.


Thanks Prabhakar
For more info: prabhakar.bhosale@gmail.com

Saturday, October 4, 2008

अर्ध गोल

गोल काढण्याचा सराव केल्याने ज्या शब्दांमध्ये वर्तुळखंड आहेत अशी अक्षरे सुबक दिसण्यास मदत होईल. मात्र पूर्ण गोल कोणत्याच मुळाक्षरात येत नाही त्यासाठी नंतर अर्धगोल काढण्याचा सराव केल्याने अक्षरांमधील वळणे नेमकी कुठे थांबवावीत याचा आपल्याला अंदाज येईल. जेणेकरून गोलाकार वळणातील मुळाक्षरे सुबक दिसण्यास मदत होईल. किमान 8 ते 10 ग्राफपेपरवर अशा प्रकारचा सराव करावा.


Thanks Prabhakar
For more info: prabhakar.bhosale@gmail.com

Friday, October 3, 2008

फोटोशॉपसाठी काही `हॅन्डी` टिप्स

नमस्कार मित्रांनो,

आज आपण फोटोशॉपसाठीच्या काही`हॅन्डी' 'टिप्स पाहूया. फोटोशॉपमध्ये काम करताना हो शॉर्टकट खूपच वेळ वाचवतात.

1) कुठूनही कलर सिलेक्ट करण्यासाठी.... ही पहिली टिप म्हणजे धमालच आहे. आपण सगळे जण आयड्रॉपर टूल वापरून आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करतो. पण हे सगळं फोटोशॉपच्या ओपऩ फाईलमध्येच. पण आता समजा मला टूलबॉक्सचा कलर पिक करायचा आहे किंवा फोटोशॉपच्या मेन्यू बारचाच कलर पिक करायचा आहे. काय करणार आता? अगदी सोप्प आहे. आय़ड्रॉपर टूल सिलेक्ट करा आणि माऊसचं डावं बटन तसंच धरून ठेवून कर्सर अख्ख्या मॉनिटर वर कुठंही न्या आणि करा कलर पिक! आहे की नाही भारी.....

2) टूल्स पॅलेट बॅकग्राउंड आणि फोरग्राउंड कलर इंटरचें म्हणजे बॅकग्राउंडचा फोरग्राउंड आणि फोरग्राउंडचा बॅकग्राउंड कलर करायचा असेल तर फक्त X ही की दाबा. (ही की टॉगल की म्हणून काम करते.) त्याचबरोबर जर तुम्ही एखादा कलर फोरग्राउंड म्हणून व एक कलर बॅकग्राउंड म्हणून सिलेक्ट केला आहे. आणि आता हे कलर्स रिसेट करायचे असतील म्हणजेच ब्लॅक आणि व्हाईट करायचे असतील तर फक्त D ही की दाबा. बॅकग्राउंड आणि फोरग्राउंड कलर्स रिसेट होतील.

3)सिलेक्ट केलेला एरिया बॅकग्राउंड किंवा फोरग्राउंड कलरने पटकन फिल करण्यासाठी....
फोरग्राउंड कलरने सिलेक्शन फिल करण्यासाठी alt की दाबून बॅकस्पेस ही कि प्रेस करा. (alt+backspace)
बॅकग्राउंड कलरने सिलेक्शन फिल करण्यासाठी ctr की दाबून बॅकस्पेस ही कि प्रेस करा. (ctr+backspace)

4) लेअरवरच्या कंन्टेन्टचा सेंटर शोधण्यासाठी.... पहिल्यांदा रुलर्स व्हिजिबल करा. (view> show rulers). लेअर सिलेक्ट करा. ctr+T  प्रेस करा. कन्टेन्ट ट्रान्सफॉर्म मोडमध्ये जाईल. आता रुलर वर माऊसने क्लिक करून गाईडलाईन ड्रॅग करा. आता ही गाईडलाईन ऑब्जेक्टच्या सेंटरच्या ग्रॅबर हॅंडल ला स्नॅप होईल. सेंटर सापडल्यावर Esc की प्रेस करा आणि ऑब्जेक्ट डिसिलेक्ट करा. याचीच आणखी एक पद्धत म्हणजे ctr+T प्रेस करण्याएेवजी जर तुम्ही स्नॅप टू हा ऑप्शन ऑन केलात तरी तुमची गाईडलाईन सेंटर पॉईंटला स्नॅप होईल. मात्र या ठिकाणी ऑब्जेक्टचा सेंटरचा ग्रॅबर हॅंड़ल दिसत नाही.

मित्रांनो,  सध्यातरी एवढ्याच टिप्स आठवतायत. आठवणींचा नुसता खंदक झालाय. लिहायला बसलं का अजिबात आठवत नाही. असो! आणखी आठवलं की परत लिहीन. तुम्हालाही काही अशा टिप्स माहीत असतील तर शेअर करा.
माझा इमेल आयडी... 
kiran.velhankar@gmail.com

गोल गोल

गोल काढण्याचा सराव केल्याने ज्या शब्दांमध्ये वर्तुळखंड आहेत अशी अक्षरे सुबक दिसण्यास मदत होईल. प्रामुख्याने क, व, ळ, ठ, ट, ढ, च, छ, ख, ब या शब्दांमध्ये गोल वळणाचा वापर झालेला दिसतो. किमान 8 ते 10 ग्राफपेपरवर अशा प्रकारचा सराव करावा. सराव करताना दंड ज्या उंचीचा काढला आहे त्याचे आठ भाग करून त्यातील चार भागातच गोल काढण्याचा सराव करावा. या सरावामुळे आडवे व उभे वर्तुळखंड काढणे सोपे जाईल.

Thursday, October 2, 2008

तिरपी रेषा / पाऊस रेषा

तिरप्या रेषांचा (पाऊसरेषा) वापर र, ष, श, ह, प्र, भ्र, ब्र, श्र, ए, त या शब्दांमध्ये तसेच उकार आणि मात्रा यामध्ये सुद्धा प्रामुख्याने झालेला दिसतो. किमान 8 ते 10 ग्राफपेपरवर अशा प्रकारचा सराव केल्यास या प्रकारची अक्षरे सुंदर दिसण्यास मदत होईल. शिवाय तुम्ही लेखणी योग्य पद्धतीने धरली आहे की नाही हे सुद्धा लक्षात येईल. सराव करताना रेषा डावीकडून उजवीकडे वर आणि वरून खाली अशा काढाव्यात.

Wednesday, October 1, 2008

आडव्या आणि उभ्या रेषा

आडव्या रेषा म्हणजे शिरोरेषा व उभ्या रेषा म्हणजे दंड असे म्हणता येईल. हा अवयव सुलेखनात सर्वांत महत्त्वाचा अवयव समजला जातो. खाली दाखविल्याप्रमाणे किमान 8 ते 10 ग्राफपेपरवर अशा प्रकारचा सराव केल्यास प्रत्येक अक्षरांचे दंड आणि शिरोरेषा काटकोनात व एका ओळीत येण्यास मदत होईल. प्रत्येक दंडामधील अंतरही सारख्या प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न करा. सराव करताना रेषा डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली अशा काढाव्यात.