Wednesday, October 15, 2008

लेअर्स पॅलेट

नमस्कार मित्रांनो, 
कसे आहात?
या आधीच्या फोटशॉप बेसिक्सच्या पोस्टमध्ये आपण लेअर्सची माहिती घेतली. आज आपण हे लेअर्स कंट्रोल करणाऱ्या लेअर्स पॅलेटची माहिती घेऊ. आधी खाली दिलेली लेअर्स पॅलेटची इमेज बघा (shortkey F7). मग आपण त्यातल्या विविध भागांची माहिती घेऊ.




नॉर्मल लेअर ः या लेअरवर तुमची इमेज स्टोअर केलेली असते.
लेअर इफेक्ट्स किंवा स्टाईल ः  तुम्ही तुमच्या लेअरवरील इमेजला काही स्पेशल इफेक्ट्स ही अॅड करू शकता. हे जे इफ्केट्स किंवा स्टाईल्स असतात हे या स्टाईल लेअरवर स्टोअर असतात. इमेजला इफेक्ट दिलेला असेल तर या लेअरवर f (स्मॉल एफ) ते साईन दिसते. याठिकाणी तुम्ही कितीही इफेक्ट अॅड करू शकता. तुम्ही ज्या क्रमाने इफेक्ट द्याल. त्याक्रमाने हे इफेक्ट्स  एकाखाली एक क्रमाने दिसतात.  आत्ता याठिकाणी ड्रॉप शॅडो हा इफेक्ट अॅप्लाय केलेला दिसतो आहे.

टाईप लेअर ः हा लेअर इमेज लेअरप्रमाणेच काम करतो. फक्त या ठिकाणी इमेजच्या एेवजी टेकस्ट असते. (तुम्ही ठिकाणी कॅरेक्टर, कलर, साईज, रंग इत्यादी गोष्टी एडिट करू शकता.)

बॅकग्राउंड लेअर ः हा लेअर कायम लॉक असतो. तुम्ही त्याची पोझिशन बदलू शकत नाही किंवा याला कोणताही इफेक्ट देता येत नाही. हा लॉक लेअर हा त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या छोट्याश्या कुलपाच्या चिन्हाने ओळखता येतो. या लेअरच्या थंबनेलवर डबलक्लिक केल्यास हा बॅकग्राऊंड लेअर नॉमर्ल लेअर मध्ये बदलला जातो.

शो / हाईड आयकॉनः लेअरच्या सुरवातीला जर तुम्हाला डोळ्याचे चिन्ह दिसत असेल तर हा लेअर व्हिजिबल असतो. हे डोळ्याचे चिन्ह म्हणजे शो/हाईड आयकॉन होय. या डोळ्याच्या चिन्हावर जर तुम्ही क्लिक केलेत तर तो लेअर त्याच्या जागेवरच असेल , मात्र त्या लेअरवरील कन्टेन्ट (इमेज)  दिसणार नाही.

ही झाली लेअर्स विंडोची माहिती. पुढच्या पोस्टमध्ये लेअर्स पॅलेटच्या फिचर्सची माहिती घेऊ.
पोस्ट आवडली असेल तर जरूर कॉमेंट करा. आवडली नसेल तर काय सुधारणा पाहिजे ते कॉमेंट करून कळवा.
kiran.velhankar@gmail.com 

No comments: