Wednesday, December 24, 2008

स्पंजचा बोळा किंवा कागदाच्या बोळ्याने अक्षरलेखन...


नमस्कार मित्रांनो,

आजपर्यंत आपण अक्षरलेखनाची विविध साधने बघितली. पण केवळ साधनं नाहीत म्हणून अडून बसायचं काहीच कारण नाही. अगदी कुठल्याही वस्तूनी तुम्ही अक्षरलेखन करू शकता. फक्त तुमच्यातला कलाकार जिद्दीला पेटला पाहिजे आणि मुळात करण्याची इच्छा पाहिजे.... असो बौद्धीक जरा जास्तच होतं... परत विषयाकडे वळूयात. तर, वेगळ्या प्रकारचे आणि ठसठशीत असे अक्षरलेखन करण्यासाठी तुम्ही कागदच्या बोळ्याचा किंवा स्पंजच्या बोळ्याचा वापर करू शकता. तुम्हाला हव्या त्या आकारचा बोळा घेऊन तो शाईत बुडवून तुम्ही मुक्तहस्ताने अक्षरलेखन करू शकता. यासाठी तुम्ही विविध रंगांच्या इंक्स वापरू शकता. कराल तेवढं थोडं आहे. मात्र एक नक्की की या प्रकारचे मुक्तहस्त अक्षरलेखन करण्यासाठी तुमची मुळाक्षरांच्या वळणे पक्की पाहिजेत आणि त्यांचा सरावही दांडगा पाहिजे. याप्रकारच्या साधनांनी तुम्हाला वेगवेगळ्या टेक्श्चरच्या आणि जाडीच्या रेषा मिळतात. खाली एक अक्षर याप्रकाराने करून दाखवले आहे ते बघा आणि सराव करा.


Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com

4 comments:

Harshal said...

hi sir !!! tumchya ya blog baddal khup khup dhanyawaad. manapasun aavadla tumcha ha upkram.

Marathi calligraphy sathi pen, brushes ani itar sarv sahitya ekatr kuthe milele? mi borivali, malad, ya parisarat sarv thikani vicharle pan typical eng calligraphy che penach detat.

mi achyut palav sirankade ek workshop kele hote (english sathi)
devnagri pan karayche hote pan vel navta.

I am designer and working in hostway solutions.

thnx again sir ...

Yogesh said...

खूप छान ब्लॉग आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा

kiran said...

हर्षल,
सर्वॅप्रथम धन्यवाद ब्लॉगला भेट दिल्याबद्दल. मराठी कॉलिग्राफिची साधनं अजून तरी एकत्र कुठे मिळत असतील असं वाटत नाही. इंग्रजी नीब्ज उलट्या बाजूने सहाणेवर घासून वापरता येतात.किंवा साध्या फाउंटन पेनचे नीब कात्रीने ४५ अंशात कापून सहाणेवर घासून ते पण वापरता येते. आणि मुंबईची मला फारच कमी माहिती आहे. आपण अच्यूत पालव सर यांच्याकडे चैकशी करा. माझ्या माहितीप्रमाणे ते मराठी कॅलिग्राफिची पेन्स तयार करतात. पण नक्की माहित नाही.

Harshal said...

Thnx sir for your suggestions and help...mi vicharin palav siranaa !