Saturday, December 6, 2008

दोन ओळींतील अंतर

नमस्कार दोस्तांनो,
आज आपण देवनागरी सुलेखन करताना दोन ओळींमध्ये किती अंतर असावे याची माहिती घेऊ. दोन अक्षरांतील अंतराला किंवा दोन शब्दांतील अंतराला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व दोन ओळींतील अंतरालासुद्धा आहे. हे अंतर किती असावे? तर मुळाक्षराच्या उंचीपेक्षा एकपट जास्त, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर शिरोरेषेच्या नऊ पट एवढे अंतर दोन ओळींमध्ये असावे. यामुळे उकार आणि मात्रा एकाखाली एक आले तरी ते एकमेकांना चिकटणार नाहीत.(खालील आकृती बघा.)

Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com

Friday, December 5, 2008

दोन शब्दांतील अंतर

नमस्कार, 
कालच्या पोस्टमध्ये आपण दोन अक्षरांतील अंतर किती हवे याची माहिती घेतली. आज आपण दोन शब्दांतील अंतराची माहिती घेऊ.
अक्षरांप्रमाणेच शब्दही एकमेकांना चिकटलेले नसावेत. यातही मोकळेपणा हवा. एका शब्दाची शिरोरेषा जिथे संपते तिथून ते दुसऱ्या शब्दाची शिरोरेषा जिथे सुरू होते यांमध्ये दोन दंडांचे अंतर असावे. कटनीब, बोरू अथवा मार्करने सुलेखन कराताना दोन शब्दांतील अंतर दाखवणारी आकृती खाली दिली आहे.  (सराव आवश्यक)

उद्याच्या पोस्टमध्ये.. दोन ओळींतील अंतर.

Thanks Prabhakar.

Thursday, December 4, 2008

अक्षर सराव (दोन ओळींतील अंतर)


नमस्कार मित्रांनो,
आजपर्यंत आपण देवनागरीची मुळाक्षरे, जोडाक्षरे आणि अंक यांची वळणे कशी आहेत, ती कशी काढावीत याची माहिती घेतली. आकृत्यांमध्ये दिलेल्या बाणांच्यानुसार सराव करणे सोपे गेले असेल अशी आशा आहे. आता प्रत्यक्ष देवनागरी लिखाणाकडे वळू. अक्षरांच्या वळणांबद्दल सांगण्यासारखे आता काही राहिले असेल असे वाटत नाही.  पण प्रत्यक्ष लिखाण करताना फक्त अक्षरांची वळणे आली म्हणजे झालं असं अजिबात नाही. या अक्षरांच्या वळणांबरोबरच दोन अक्षरांतील अंतर, दोन शब्दांतील अंतर आणि दोन ओळींतील अंतर किती पाहिजे याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. आजपासून आपण ही अंतराची माहिती घेणे सुरू करू.

दोन अक्षरांतील अंतर
अक्षरे लिहीताना ती एकमेकांना चिकटलेली नसावीत. त्यात मोकळेपणा असावा. हा मोकळेपणापण जास्त नसावा; तर हा मोकळेपणा किती असावा याचेही प्रमाण ठरलेले आहे.  कटनीब, बोरू किंवा मार्करने अक्षरलेखन करताना एका कान्याएवढे अंतर दोन अक्षरांत असणे आवश्यक आहे. मात्र काही अक्षरांची रुंदी ही कमी- जास्त असते. (उदा. व, र आणि क, ख यांची रुंदी) त्यावेळी हे अंतर डोळ्यांना चांगले दिसेल एवढे असावे. अर्थात त्यासाठीजी नजर तयार करण्यासाठी सराव आवश्यक आहेच.  साध्या पेनाने लिहीताना ते बदलेल. एकदा का कटनीब किंवा बोरूने लिखाणाचा सराव केलात तर साध्या पेनानं लिहिताना किती अंतर सोडावे याचा अंदाज तुम्हाला सहज येईल. कटनीब, बोरू किंवा मार्करने सुलेखन करताना किती अंतर सोडावे हे दर्शविणारी आकृती खाली दिली आहे.

उद्याच्या पोस्टमध्ये दोन शब्दांमधील अंतराची माहिती घेऊ.

Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com

Wednesday, December 3, 2008

देवनागरी आकडे 9 आणि 0

नमस्कार मित्रांनो,
आज आपण देवनागरीतील शेवटच्या दोन आकड्यांचा अभ्यास करूयात. हे आकडे आहेत 9 आणि 0. हे दोनही आकडे अर्धगोलांपासून तयार झाले आहेत. आखील दिलेल्या आकृतीचे निरिक्षण करा आणि सरावही करा.

Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com

Tuesday, December 2, 2008

फोटोशॉप लेअर्स बेसिक्स (व्हिडिओ)

नमस्कार मित्रांनो,

आज सर्फिंग करताना फोटोशॉप लेअर्स बेसिक्स चा एक व्हिडिओ पाहण्यात आला.  नव्यानी फोटोशॉप शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे.  


देवनागरी आकडे 7 आणि 8

नमस्कार,

आज आपण देवनागरी 7 आणि 8 या दोन आकड्यांच्या वळणांचा अभ्यास करणार आहोत. खालील आकृती बघा. हे दोन्ही आक़डे अर्धगोलांपासून तयार झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. त्यांच्या गाठी आणि वळणांचा अभ्यास करा आणि सरावही करा.

Thanks Prabhakar
Prabhakar.bhosale@gmail.com

Monday, December 1, 2008

देवनागरी आकडे 5 आणि 6

नमस्कार दोस्तांनो,
आकड्यांच्या वळणांचा सराव सुरू केलात की नाही. नसेल तर लगेच सुरू करा... आज आपण पुढच्या दोन आकड्यांची वळणे बघणार आहोत. हे आकडे आहेत 5 आणि 6.  या दोन्ही आकड्यांच्या वळणांमध्ये अर्धगोलांचा वापर दिसून येतो. या आकड्यांच्या वळणांतील गाठींचेही नीट निरीक्षण करा आणि चार्ट पेपर वर सराव करा.

Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com