Monday, October 6, 2008

ऑटो कॅडची फाईल कोरल मध्ये ओपन करताना... भाग 2

नमस्कार मित्रांनो,

ऑटो कॅडची फाईल कोरल मध्ये इम्पोर्ट करण्यासाठी काय करायचं हे आपण या आधीच्या पोस्ट मध्ये बघितलं. माझा एक आर्टिस्ट मित्र श्रीकांत यानी याच्या पुढची माहिती आपल्या सगळ्यांसाठी कळवली आहे. ही माहिती ऑटो कॅडच्या फाईलची कोरल मधून प्रिंट सोडण्यासंदर्भातील आहे. आणि महत्त्वाची तर नक्कीच आहे. ...
श्रीकांतनी कळवले आहे की, ऑटो कॅडची फाईल कोरलमध्ये इम्पोर्ट केल्यावर दिसताना छान दिसेल. त्याचा डिजिटल प्रिंटही छान येईल. नॉर्मल लेजर प्रिंटही छान येईल. पण.....
जर का या फाईल चे फोर कलर सेपरेशन करायचं म्हटलं तर पॉझिटीव्ह किंवा CTP करताना या डिझाईनमधील लाईन्स ऑफसेट प्रिंटींगला येत नाहीत.  त्यामुळे या लाईन्स कोरल मध्ये फाईल इम्पोर्ट केल्यावर .5 च्या करून घ्याव्यात.

मित्रांनो माझ्यासाठी ही माहिती नविनच आहे.  त्यामुळे Thanks to Shrikant.  तुमच्याकडेही अशी माहिती असल्यास मला जरूर कळवा. माझा इमेल आयडी... kiran.velhankar@gmail.com

Sunday, October 5, 2008

मात्रा आणि रफार

मात्रा शिरोरेषेच्या चारपट असावा आणि रफार तीन पट असावा. खाली दाखविल्या प्रमाणे किमान 8 ते 10 ग्राफपेपरवर अशा प्रकारचा सराव करावा.




उकार आणि वेलांटी

उकार आणि वेलांटी शिरोरेषेच्या चारपट असावी खाली दाखविल्या प्रमाणे किमान 8 ते 10 ग्राफपेपरवर अशा प्रकारचा सराव करावा.


Thanks Prabhakar
For more info: prabhakar.bhosale@gmail.com

Saturday, October 4, 2008

अर्ध गोल

गोल काढण्याचा सराव केल्याने ज्या शब्दांमध्ये वर्तुळखंड आहेत अशी अक्षरे सुबक दिसण्यास मदत होईल. मात्र पूर्ण गोल कोणत्याच मुळाक्षरात येत नाही त्यासाठी नंतर अर्धगोल काढण्याचा सराव केल्याने अक्षरांमधील वळणे नेमकी कुठे थांबवावीत याचा आपल्याला अंदाज येईल. जेणेकरून गोलाकार वळणातील मुळाक्षरे सुबक दिसण्यास मदत होईल. किमान 8 ते 10 ग्राफपेपरवर अशा प्रकारचा सराव करावा.


Thanks Prabhakar
For more info: prabhakar.bhosale@gmail.com

Friday, October 3, 2008

फोटोशॉपसाठी काही `हॅन्डी` टिप्स

नमस्कार मित्रांनो,

आज आपण फोटोशॉपसाठीच्या काही`हॅन्डी' 'टिप्स पाहूया. फोटोशॉपमध्ये काम करताना हो शॉर्टकट खूपच वेळ वाचवतात.

1) कुठूनही कलर सिलेक्ट करण्यासाठी.... ही पहिली टिप म्हणजे धमालच आहे. आपण सगळे जण आयड्रॉपर टूल वापरून आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करतो. पण हे सगळं फोटोशॉपच्या ओपऩ फाईलमध्येच. पण आता समजा मला टूलबॉक्सचा कलर पिक करायचा आहे किंवा फोटोशॉपच्या मेन्यू बारचाच कलर पिक करायचा आहे. काय करणार आता? अगदी सोप्प आहे. आय़ड्रॉपर टूल सिलेक्ट करा आणि माऊसचं डावं बटन तसंच धरून ठेवून कर्सर अख्ख्या मॉनिटर वर कुठंही न्या आणि करा कलर पिक! आहे की नाही भारी.....

2) टूल्स पॅलेट बॅकग्राउंड आणि फोरग्राउंड कलर इंटरचें म्हणजे बॅकग्राउंडचा फोरग्राउंड आणि फोरग्राउंडचा बॅकग्राउंड कलर करायचा असेल तर फक्त X ही की दाबा. (ही की टॉगल की म्हणून काम करते.) त्याचबरोबर जर तुम्ही एखादा कलर फोरग्राउंड म्हणून व एक कलर बॅकग्राउंड म्हणून सिलेक्ट केला आहे. आणि आता हे कलर्स रिसेट करायचे असतील म्हणजेच ब्लॅक आणि व्हाईट करायचे असतील तर फक्त D ही की दाबा. बॅकग्राउंड आणि फोरग्राउंड कलर्स रिसेट होतील.

3)सिलेक्ट केलेला एरिया बॅकग्राउंड किंवा फोरग्राउंड कलरने पटकन फिल करण्यासाठी....
फोरग्राउंड कलरने सिलेक्शन फिल करण्यासाठी alt की दाबून बॅकस्पेस ही कि प्रेस करा. (alt+backspace)
बॅकग्राउंड कलरने सिलेक्शन फिल करण्यासाठी ctr की दाबून बॅकस्पेस ही कि प्रेस करा. (ctr+backspace)

4) लेअरवरच्या कंन्टेन्टचा सेंटर शोधण्यासाठी.... पहिल्यांदा रुलर्स व्हिजिबल करा. (view> show rulers). लेअर सिलेक्ट करा. ctr+T  प्रेस करा. कन्टेन्ट ट्रान्सफॉर्म मोडमध्ये जाईल. आता रुलर वर माऊसने क्लिक करून गाईडलाईन ड्रॅग करा. आता ही गाईडलाईन ऑब्जेक्टच्या सेंटरच्या ग्रॅबर हॅंडल ला स्नॅप होईल. सेंटर सापडल्यावर Esc की प्रेस करा आणि ऑब्जेक्ट डिसिलेक्ट करा. याचीच आणखी एक पद्धत म्हणजे ctr+T प्रेस करण्याएेवजी जर तुम्ही स्नॅप टू हा ऑप्शन ऑन केलात तरी तुमची गाईडलाईन सेंटर पॉईंटला स्नॅप होईल. मात्र या ठिकाणी ऑब्जेक्टचा सेंटरचा ग्रॅबर हॅंड़ल दिसत नाही.

मित्रांनो,  सध्यातरी एवढ्याच टिप्स आठवतायत. आठवणींचा नुसता खंदक झालाय. लिहायला बसलं का अजिबात आठवत नाही. असो! आणखी आठवलं की परत लिहीन. तुम्हालाही काही अशा टिप्स माहीत असतील तर शेअर करा.
माझा इमेल आयडी... 
kiran.velhankar@gmail.com

गोल गोल

गोल काढण्याचा सराव केल्याने ज्या शब्दांमध्ये वर्तुळखंड आहेत अशी अक्षरे सुबक दिसण्यास मदत होईल. प्रामुख्याने क, व, ळ, ठ, ट, ढ, च, छ, ख, ब या शब्दांमध्ये गोल वळणाचा वापर झालेला दिसतो. किमान 8 ते 10 ग्राफपेपरवर अशा प्रकारचा सराव करावा. सराव करताना दंड ज्या उंचीचा काढला आहे त्याचे आठ भाग करून त्यातील चार भागातच गोल काढण्याचा सराव करावा. या सरावामुळे आडवे व उभे वर्तुळखंड काढणे सोपे जाईल.

Thursday, October 2, 2008

तिरपी रेषा / पाऊस रेषा

तिरप्या रेषांचा (पाऊसरेषा) वापर र, ष, श, ह, प्र, भ्र, ब्र, श्र, ए, त या शब्दांमध्ये तसेच उकार आणि मात्रा यामध्ये सुद्धा प्रामुख्याने झालेला दिसतो. किमान 8 ते 10 ग्राफपेपरवर अशा प्रकारचा सराव केल्यास या प्रकारची अक्षरे सुंदर दिसण्यास मदत होईल. शिवाय तुम्ही लेखणी योग्य पद्धतीने धरली आहे की नाही हे सुद्धा लक्षात येईल. सराव करताना रेषा डावीकडून उजवीकडे वर आणि वरून खाली अशा काढाव्यात.

Wednesday, October 1, 2008

आडव्या आणि उभ्या रेषा

आडव्या रेषा म्हणजे शिरोरेषा व उभ्या रेषा म्हणजे दंड असे म्हणता येईल. हा अवयव सुलेखनात सर्वांत महत्त्वाचा अवयव समजला जातो. खाली दाखविल्याप्रमाणे किमान 8 ते 10 ग्राफपेपरवर अशा प्रकारचा सराव केल्यास प्रत्येक अक्षरांचे दंड आणि शिरोरेषा काटकोनात व एका ओळीत येण्यास मदत होईल. प्रत्येक दंडामधील अंतरही सारख्या प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न करा. सराव करताना रेषा डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली अशा काढाव्यात.