नमस्कार मित्रांनो,
आपणा सर्वांना पेंटिगच्या ब्रश बद्दल काही सांगण्याची गरज नाही. पण बाजारात पेंटींगच्या ब्रशव्यतिरिक्तही अनेक प्रकारचे ब्रश उपलब्ध असतात किंवा आहेत. उदाहरणार्थ दाढीचा ब्रश, दात घासण्याचा ब्रश, कपडे धुण्याचा ब्रश इत्यादी. या सगळ्या प्रकारच्या ब्रशपासून आपण अक्षरलेखन करू शकतो किंवा त्यांचा वापर अक्षरलेखनासाठी बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी करता येतो. फक्त थोडा आऊट ऑफ द बॉक्स विचार करण्याची गरज आहे. खाली दाढीचा ब्रश वापरून केलेली बॅकग्राउंड देत आहे. याप्रकारे वेगवेगळे ब्रश वापरून तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या बॅकग्राउंड तयार करू शकता. फक्त मेंदूवरची धूळ झटका आणि व्हा सुरू..... :)
1 comment:
मी बीएड करत आहे आम्हाला खुप तक्ते तयार करायला लागतात (लेसन घेन्यासाठी) आपल्या Blog मध्ये तक्त्यावरील अक्शर सुधारन्यासाठी खुप महत्वाची महिती मिळाली अगदी मार्कर कोणता वापरायच याची सुद्धा अतिशय महत्त्वाची महिती मिळाली मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद!
विजय फडके,
Post a Comment