नमस्कार दोस्तांनो,
आज आपण स्पीडबॉल नीब्ज हे अक्षरलेखनाचे आणखी एक साधन बघुयात. ही नीब्ज प्रामुख्याने इंग्रजी अक्षरलेखनासाठी बनविली गेलेली आहे. याची पेन्स नाहीत. ही नीबेज होल्डरला लावून शाईमध्ये बुडवून अक्षरलेखन करतात. जसे आपण बोरूच्या साह्याने करतो तसेच. या नीब्ज पातळ पत्र्यापासून्र बनवलेल्या असतात. या नीब्ज विविध आकारांत उपलब्ध आहेत. मात्र या नीब्ज तुम्हाला फक्त ड्रॉइंग स्टेशनरीच्या दुकानातच मिळतील . स्केचपेनप्रमाणे कुठेही सहजपणे मिळणार नाहीत. आपण देवनागरी अक्षरलेखनासाठी प्रामुख्याने टोकाला राऊंड शेप असलेल्या नीब्जचा वापर करतो. कसे ते खालील आकृतीत पाहा. त्याचबरोबर स्पीडबॉल नीब्जचे विविध प्रकार दाखवणारे छायाचित्रही सोबत देत आहे.
1 comment:
छान माहिती..!
१. हे ब्लेडस् - कॅलिग्राफिच्या ब्लेड पेक्षा वेगळे असतात का?
२. शिवाय तुम्ही येथे टाकलेली ईमेजे "वेड कार्टुनचे" कसे लिहिले आहे.. म्हणजे कंम्प्युटरच्या मदतीने की ते ब्लेडस् वापरुन...?
आभार
Post a Comment