Sunday, December 7, 2008

कलात्मक अक्षरलेखन

नमस्कार मित्रांनो,
अक्षरांचे मुळ आकार, त्यांची वळणे,  उंची, अंतर इत्यादी इत्यादी गोष्टींची माहिती आपण घेतली. आता या सर्वांचा अभ्यास केल्यावर तुम्ही देवनागरी अक्षरलेखन नक्कीच करू शकाल. पण एवढं आलं म्हणजे सगळं झालं असं नाही. आत्तापर्यंत तर फक्त पुस्तकी अभ्यासस झालाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण तुमच्या सारख्या कलाकार मित्रांनी इथे थांबून चालणार नाही. आता तर तुमच्या खऱ्या प्रतिभेचा कस लागणार आहे.  या सुंदर लिपिला आता तुम्हाला जोड द्या तुमच्यातील कलात्मकतेची. त्यासाठी तुम्ही निरनिराळ्या लेखण्यांच्या वापर करू शकता याशिवाय मार्कर, बोल्टपेन, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश, शिवाय दाढीचा ब्रश, टुथब्रश यांचाही वापर तुम्ही करू शकता. ज्यावर लिहायचं त्या कागदाच्या असंख्य प्रकारांवर तुम्ही प्रय़ोग करू शकता. एवढंच काय तर लाकूड, काच, भिंत, कापड कशावरही तुम्ही सुलेखन करू शकता. आज फक्त थोडा विचार करून ठेवा की तुम्ही कशाकशावर सुलेखन करू शकता. उद्यापासून आपण यातील काही साधनांनी सुलेखन कसं करायचे याची माहिती घेऊ.

आतापर्यंत आपण बघितलेली मुळाक्षरे एकत्र खाली देत आहे. 

click to enlarge

kiran.velhankar@gmail.com

1 comment:

jainkamal said...

dear friend
my name is jainkamal
i want to see u how i can
i m mumbai based designed loksatta. indian express, prabhat, lokmat samachar, debonair. india today, my cell no is 9821139310.
regards
jainkamal