नमस्कार दोस्तांनो...
तुमच्यापैकी जे आर्टिस्ट वर्तमानपत्राशी संबंधित आहेत ते या शब्दाशी परिचित असतील. इतरांना हा प्रकार माहित असण्याचं फारसं कारण नाही; पण इन्फोग्राफिक हा प्रकार इतका इंटरेस्टिंग आहे की बस. पण त्यासाठी इन्फोग्राफिक म्हणजे काय ते कसे तयार करायचे आणि ते कसे बघायचे या सगळ्यामागे एक शास्त्र आहे. थांबा! घाबरू नका शास्त्र म्हणजे थोडं अवघड होतय ना!. मग आपण त्याला पद्धत असं म्हणू. एकदा की ही पद्धत तुम्हाला समजली की झालं. तुम्ही माझ्याइतकाच त्याचा आनंद घ्यायला लागाल. मला स्वतःला इन्फग्राफिक्समधले फार काही कळत नव्हतं. "सकाळ'मध्ये न्यूजपेपर आर्टिस्ट म्हणून काम करताना प्रसिद्ध इन्फोग्राफर पीटर आँग आणि 'न्यूज विक'चे आर्ट डिरेक्टर कार्ल गुड यांच्याबरोबर त्यांच्या वर्कशॉपमध्ये, सेमिनारमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि या विषयाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलून गेला.
फार बडबड झाली नाही का.... आता प्रत्यक्ष विषयाकडे जाऊ.. (एका किंवा दोन पोस्टमध्ये हा विषय कव्हर होणारा नसल्यामुळे तुम्हाला बऱ्याच संयमाची आवश्यकता आहे.)
इन्फोग्राफिक म्हणजे काय?
इन्फोग्राफिकची अगदी सोपी व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल..चित्र, शब्द आणि छायाचित्र यांची एकत्रितरित्या केलेली मांडणी म्हणजे इन्फोग्राफिक की ज्याद्वारे वाचकाला, तो वाचत असलेल्या गोष्टीची माहिती कमीत कमी शब्दात आणि कमी वेळेत पण अधिक चांगली मिळावी. आता तुम्ही म्हणाल की हे का झेंगट आहे? थांबा, उदाहरणासह सांगतो. ज्यावेळी अॅपल कंपनीनी आयफोन लॉंच केला त्यावेळी संपूर्ण जगभरात त्याविषयी उत्सूकता होती. आता जर का मला ही माहिती तुम्हाला शब्दांत सांगायची झाली तर एकवेळ भरपूर मोठ्ठी माहिती मी लिहू पण शकेन पण.... ती तुम्हाला वाचायला आवडेल? आणि ती किती समजेल? पण समजा हीच माहिती मी तुम्हाला दाखलवी तर?????... हेच इन्फोग्राफिक.. खालील इन्फोग्राफिक बघा.
यामध्ये आयफोन कसा आहे? तो कसा दिसतो? त्याची वैशिष्टे काय? ही सगळी माहिती आहे पण मुख्य म्हणजे ती तुम्हाला दिसतीये सुद्धा. एखादी माहिती शब्दांतून सांगण्यापेक्षाती प्रत्यक्ष दाखवणं म्हणजेच इन्फोग्राफिक..... हूशऽऽऽऽऽऽ... आज इथेच थांबू. पुढील माहिती लवकरंच... विषय आवडला असेल (नसेल) तर जरूर कॉमेंट करा. किंवा मेल करा.. kiran.velhankar@gmail.com
1 comment:
wah kay mast lihilay ,. ekdum lively .. waiting for new post !
Post a Comment