जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विंची याने काढलेली ही चित्रे. कोणतीही आधुनिक सामग्री उपलब्ध नसताना हे अशा प्रकारचे परफेक्ट ड्रॉइंग काढणे म्हणजे.. केवळ ग्रेट! चित्र आणि माहिती (शब्द) यांचा एकत्रित वापर इथे बघायला मिळतो.
क्लिष्ट, सहजपणे न कळणाऱ्या गोष्टी सोपेपणाने इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून मांडता येतात. परंतु, केवळ लिखित मजकूर जशाच्या तशा "इलस्ट्रेशन'च्या स्वरूपात मांडणे म्हणजे "इन्फोग्राफिक' नव्हे. माहितीची सुत्रबद्ध मांडणी, त्यातील घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध याद्वारे सुसंबंधित माहिती वाचकांपर्यंत पोचविणे "ग्राफिक्स'मध्ये अपेक्षित आहे. तुम्हाला सगळ्यांना सध्या चर्चेत असलेला ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा मराठीत हरितगृह परिणाम याची माहिती असेल. पण आता ही सगळी शास्त्रीय माहिती म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे नक्की काय? तो कशामुळे होतो? त्याचा परिणाम पृथ्वी, मानव, वनस्पती यांच्यावर काय होतो. हे सगळं शब्दांत सांगायचं म्हणजे????? नकोच ते.
हीच माहीती इन्फोग्राफिकच्या माध्यमातून लोकांपुढे मांडली तर ती किती सोपी होते ते खालच्या चित्रात पाहा.
नुसती माहितीच नाही तर, एखादी घटनासुद्धा तुम्ही ती घटना कशी घडली हे इन्फोग्राफिकच्या माध्यमातून लोकांना दाखवू शकता. खालील चित्र पाहा. World Trade Center झालेल्या हल्ल्यांची घटना सांगणारे हे इन्फोग्राफिक आहे.
आज एवढंच. आता पुढच्या पोस्टपासून इन्फोग्राफिक्सचे प्रकार कोणते? ते तयार करताना काय काळजी घ्यावी लागते याची माहिती घेऊ.
No comments:
Post a Comment