नमस्कार मित्रांनो,
आजची पोस्ट कोरल ड्रॉशी संबंधीत पण प्रत्यक्ष डिझाईनशी संबंधीत नाही. अगदी छोटी आहे, पण हे जर का माहित नसेल तर ऐन वेळेला तोंडचं पाणी पळवणारी आहे. आणि ही माहिती पोस्ट करायला कारणही तसंच घडलं. दोन दिवसांपूर्वी एका मित्राचा फोन आला की त्याच्याकडे एका बिल्डरच्या नव्या साईटचं ब्रोशर डिझाईनचं काम आलंय आणि त्यानी दिलेल्या प्लॅनच्या PDF फाईल्स कोरलमध्ये एम्पोर्ट करताना एरर येतीये. डेडलाईन जवळ आलेली आणि सगळे उपाय थकलेले.... (अर्थात PDF वरून JPEG वगैरे वगैरे करून बघण्याचे प्रयत्न झाले, पण शेवटी व्हेक्टर ते व्हेक्टर) आणि ऑटो कॅडची फाईल काही केल्या इम्पोर्ट होत नव्हती... काय बरं कारण असावं... उत्तर अगदी सोपं आहे.
ऑटोकॅडमध्ये तयार केलेली फाईल ही बऱ्याच वेळा आकारानी खूप मोठी असते. (फाईल साईज नव्हे... लांबी आणि रुंदी) आणि आपण कोरल ड्रॉमध्ये इम्पोर्ट करताना पेपरसाईज A4 किंवा A3 साईज सवईप्रमाणे घेतो. मात्र याठिकाणी तुम्हाला पेज साईज मोठा घ्यावा लागतो. (उदा. 50 फूट बाय 50 फूट, 80 फूट बाय 80 फूट किंवा गरजेनुसार) आणि आता जर तुम्ही हा ऑटो कॅडची फाईल इम्पोर्ट केलीत तर इम्पोर्ट व्हायला वेळ लागेल पण इम्पोर्ट नक्की होईल.
अर्थात मला ही गोष्ट अशीच एक फाईल इम्पोर्ट करताना अपघातानेच कळाली. तुम्हालाही या संबंधी काही माहिती असेल किंवा तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर जरूर लिहा, कॉमेंट करा. इंग्रजीत लिहीलं तरी चालेल. शेवटी काय तर या छोट्या छोट्या गोष्टीही माहित असणं खूप गरजेचं असतं. तेव्हा जरूर लिहा.
No comments:
Post a Comment