Thursday, September 25, 2008

अक्षर अवयव

योग्य पद्धतीने लेखणी धरली आहें याची खात्री झाल्यानंतर आपण अक्षरांच्या अवयवांबद्दल माहिती करून घेऊ. खालील चित्रावरून आपल्याला अक्षरांचे अवयव समजतील. हे अवयव काढण्याचा सराव केल्यास त्यावरून सुलेखन करणे सोपे जाईल.

अक्षरउंची
देवनागरी लिपी लिहिताना तुम्ही ज्या कटनीब किंवा मार्करचा वापर करणार आहात त्या साधनापासून काढलेल्या शिरोरेषेच्या जाडीच्या आठ पट अक्षरांची उंची असावी. मात्रा आणि उकार यांना ती चार पट असावी. यासाठी खालील आकृती पाहा.
Thanks Prabhakar
For more info: prabhakar.bhosale@gmail.com

2 comments:

anil kusumbe said...

nice works by you

Unknown said...

क आणि फ मधे दंड नंतर जो अर्ध गोलाकार भाग बनवला जातो त्याला काय म्हणतात