हे सर्व घडते ते फोटोशॉपच्या वर्क एरिया मध्ये डबलक्लिक केल्यावर. त्यामुळे आधी वर्क एरिया म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेऊ.
फोटोशॉप सुरू केल्यावर ज्या रिकाम्या भागात फाईल ओपन होते तो भाग किवा दूसऱ्या भाषेत डॉक्यूमेंट विंडोच्या मागील ग्रे रंगातील भाग म्हणजे वर्कएरिया. (The work area is the Gray area behind the document window).
1) वर्कएरियामध्ये डबलक्लिक केल्यास Open Document ही विंडो ओपन होते.
2) कंट्रोल की दाबून ठेवून वर्कएरियावर डबलक्लीक केल्यास New Document ही विंडो ओपन होते.
3) अल्ट की दाबून ठेवून वर्कएरियावर डबलक्लिक केल्यास Open As ही विंडो ओपन होते.
4) शिफ्ट आणि कंट्रोल की दाबून ठेवून वर्कएरियावर डबलक्लिक केल्यास ओपन असलेली फाईल Save होते.
5) शिफ्ट की दाबून ठेवून वर्कएरियावर डबलक्लिक केल्यास ऍडोब ब्रिज आणि फाईल ब्राऊजर ओपन होतो. (CS2)
जर डबलक्लिक केल्यावर काही घडत नसेल तर पुढील गोष्टींची खात्री करा.
1. तुम्ही वर्क एरियातील मोकळ्या जागेतच क्लिक करत आहात ना?
1. तुम्ही वर्क एरियातील मोकळ्या जागेतच क्लिक करत आहात ना?
2. तुम्ही चुकून टूल बार वर किंवा ओपन असलेल्या डॉक्यूमेंटवरतर क्लिक करत नाही?
आज पहिल्या पोस्टमध्ये इतकेच.
यापैकी पहिला डबलक्लिकचा शॉर्टकट बऱ्याचजणांना माहित असतो. पण बाकीच्यांचा वापर माहित नसल्यामुळे होताना दिसत नाही. हे शॉर्टकट वापरून बघा. तुमचा काही वेळ नक्की वाचेल. आणि हो, तुम्हाच्याकडेही अशी काही माहिती असेल तर जरूर कळवा अथवा कॉमेंट करा. शेअर केल्याने आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल नाही का?
8 comments:
Really helpful for the graphic designer.. chan ani sopya bhashet lihilay... very easy to understand
Thanks Gauri,,,
Keep reading...
yeah agree with gauri...
vel vachvnyacha uttam upay... keep on posting more... vaat baghtoy :)
Yes, Its Really helpful for the graphic designer.. very easy to understand. All the Designer Learn From This...
And Best Of Luck
For Best Blogger In Design.
Thanks sir
Thanks Vijay, Thanks Shraddha.. keep reading... more to come soon..
hi kiran sir
nice job
yar
anil kusumbe
Thanks Anil,,
keep reading...
thanks
किरणजी धन्यवाद,
मी एक enthusiast आहे calligraphy चा, खरतर नवखाच म्हणा आणि मराठी ही आहे. जेव्हा पासून फोटोशॉप वर हाथ साफ करायला सुरवात केली, तेव्हा पासून calligraphy वर प्रयत्न करत होतो पण हवे तसे results मिळत नव्हते. कारण दिशा नव्हती आणि तुमच्या ब्लॉग ने नेमकी दिशा दिसत्ये आहे.
काखेत कळसा आणि गूगल भर शोधत होतो!
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आपण पोस्ट करत रहा आम्ही पोच्त देत राहू!
अभिजीत - abhijeet.patil80@gmail.com
Post a Comment