नमस्कार मित्रांनो,
आजची पोस्ट ही मराठी अक्षरलेखन या विषयाची शेवटची पोस्ट. आतापर्यंत आपण अक्षरलेखनाचे विविध प्रकार बघितले. पण आता आज जो प्रकार आपण बघणार हा त्या सगळ्यांतला अवघड प्रकार आहे. तो म्हणजे विषयानुरूप अक्षरलेखन. नुसते एखाद्याचे नाव लिहिणे किंवा देवनागरीमध्ये एखादा श्लोक लिहिणे फारसे अवघड नाही. मात्र विषयाला, एखाद्या शब्दाच्या अर्थानुसार अक्षरलेखन करणे फारच अवघड आहे. त्यासाठी अक्षरलेखनाची तपस्याच करावी लागते. थोडक्यात खूपच प्रॅक्टीसची गरज असते. आपण उदाहरण घेऊ. समजा तुम्हाला सम्राज्ञी या शब्दाचे अक्षरलेखन करायचे असेल तर कसे कराल? किंवा छुम छुम पावसा ही ओळ तुम्हाला अक्षरलेखनात करायची वेळ आली तर?
खाली केलेले अक्षरलेखन बघा. म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्षात येईल.
Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com