Saturday, January 31, 2009

नेमप्लेट किंवा दारावरची पाटी


नमस्कार मित्रांनो,

आज आपण सुलेखनाचा थोडा वेगळ्या प्रकारे वापर बघणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घराच्या दारावर नेमप्लेट ही असतेच. हीच नेमप्लेट जर तुम्ही सुलेखन वापरून केलीत तर ती इतर नेमप्लेट्स पेक्षा नक्की वेगळी आणी आकर्षक होईल. त्याचप्रमाणे घरातल्या भिंतीवरही तुम्ही याप्रकारे सुलेखन करू शकता.  तुम्ही केलेल्या अक्षरलेखन हे बाजारमध्ये लाकूड किंवा धातूच्या पट्ट्यांवर कोरून मिळते. खाली उदाहरणार्थ एक नेमप्लेटट चे डिझाईन देलेले आहे. हे अक्षरलेखन माझा मित्र प्रभाकर याने इलस्ट्रेटर मध्ये केलेले आहे.


Thanks Prabhakar
for more info: prabhakar.bhosale@gmail.com

Monday, January 19, 2009

नमस्कार मित्रांनो...

नमस्कार मित्रांनो, 
सर्वप्रथन बरेच दिवस नवीन पोस्ट न लिहिल्याबद्दल माफी मागतो. पण काय करणार, कामाचा ताण सध्या जरा जास्त आहे. त्यामुळे नवीन पोस्ट लिहिणं शक्य होत नाहीये.  तरी लवकरात लवकर नवं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न आहे. समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.

लवकरच परत भेटू.
किरण.

Friday, January 9, 2009

काचेवर किंवा मातीच्या भांड्यांवर अक्षरलेखन

नमस्कार मित्रांनो,

यावेळेला पोस्ट टाकायला जरा उशिरच झाला. नेहमीप्रमाणेच माफ करालच. असो, आज आपण काचेच्या किंवा मातीच्या भांडयांवर कसे अक्षरलेखन करायचे ते बघणार आहोत. काचेवर सुलेखन करण्यासाठी ग्लास लायनर किंवा ग्लास मार्करच्या मदतीने सुलेखन करून त्याच तुम्ही रंग भरू शकता. तसंच मातीच्या भांड्यांसाठी अॅक्रिलिक किंवा ऑईल पेंटचाही वापर करता येईल. खाली काचेच्या मग वर केलेले सुलेखन उदाहरणार्थ दिले आहे.  तुम्ही केलेले सुलेखन तुम्ही काच, तांब्याची प्लेट इत्यादींवर इचिंगही करता येईल. मात्र त्यासाठी इचिंगची व्यवस्थित माहिती पाहिजे. शेवटी काय तर, तुम्ही कराल तितके प्रयोग कमी आहेत. फक्त कल्पनाशक्ती पाहिजे बघा.


Thanks Prabhakar
for more info: prabhakar.bhosale@gmail.com

Monday, January 5, 2009

कापडावर अक्षरलेखन...


नमस्कार मित्रांनो,

आज आपण कापडावर कोणत्या प्रकारे सुलेखन करता येते ते बघू.  कापडावर सुलेखन करण्यासाठी फॅब्रिक कलर्स किंवा फेव्हिक्रिल कलर्सचा वापक करावा लागतो. हे रंग बाजारात सहज उपलब्ध होतात. मात्र एकदा का रंगाचा वापर केला की तो रंग पुसता येत नाही. त्यामुळे तुम्ही टि शर्टवर किंवा टॉप वर अक्षरलेखन करत असाल तर जरा काळजीपूर्वक करा. टिशर्ट, टॉप, ओढणी, जीन्स, पडदे, बेडशीट, अभ्रे इत्यादी कशावरही तुम्ही अक्षरलेखन करू शकता. खालील आकृतीवरून टी शर्ट किंवा टॉपवर कोणत्या प्रकारची कॅलिग्राफी करता येते ते दाखवले आहे.


Thanks Prabhkar
prabhakar.bhosale@gmail.com



Wednesday, December 31, 2008

नववर्षाच्या शुभेच्छा !

नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

किरण वेल्हाणकर

Tuesday, December 30, 2008

विविध पृष्ठभागांवर सुलेखन

नमस्कार दोस्तांनो,
आजपर्यंत आपण सुलेखन कसे करायचे, अक्षरांची वळणे कशी, साधने कोणती , इत्यादी गोष्टींची माहिती घेतली. आजपासून आपण कोणकोणत्या पृष्ठभागांवर आपण सुलेखन ककरू शकतो याची माहिती घेऊ. त्याचबरोबर यासाठी कोणत्या रंगांचा वापर करता येतो याचीही माहीती घेऊ. हातकागद, कापड, काच, मातीची भांडी, दारावरची नावाची पाटी इत्यादी विविध पृष्ठभागांवर सुलेखन होऊ शकते. 
आज आपण हातकागदावर कशा प्रकारे सुलेखन करता येते ते बघू. 
हातकागदावर सुलेखन करताना प्रामुख्याने शाईचाच वापर करावा लागतो.  फोटोइंक्स किंवा वॉटरप्रुफ इंक्सही वापरता येतात. हातकागदावर सुलेखन करताना त्याचा विशिष्ठ पोताचा वापर करून घेऊन उत्तम सुलेखन करता येते. खाली दिलेली आकृती बघा. याप्रकारे विविध रंगात सुलेखन करून त्याची फ्रेम करून घरात भिंतीवरही लाऊ शकता. फक्त तुम्ही कसा विचार करता यावर ते अवलंबून आहे.

Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com

Saturday, December 27, 2008

कॅलिग्राफिसाठी बॅकग्राउंड

नमस्कार मित्रांनो,


आपणा सर्वांना पेंटिगच्या ब्रश बद्दल काही सांगण्याची गरज नाही. पण बाजारात पेंटींगच्या ब्रशव्यतिरिक्तही अनेक प्रकारचे ब्रश उपलब्ध असतात किंवा आहेत. उदाहरणार्थ दाढीचा ब्रश, दात घासण्याचा ब्रश, कपडे धुण्याचा ब्रश इत्यादी. या सगळ्या प्रकारच्या ब्रशपासून आपण अक्षरलेखन करू शकतो किंवा त्यांचा वापर अक्षरलेखनासाठी बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी करता येतो. फक्त थोडा आऊट ऑफ द बॉक्स विचार करण्याची गरज आहे. खाली दाढीचा ब्रश वापरून केलेली बॅकग्राउंड देत आहे. याप्रकारे वेगवेगळे ब्रश वापरून तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या बॅकग्राउंड तयार करू शकता. फक्त मेंदूवरची धूळ झटका आणि व्हा सुरू..... :)