Saturday, December 27, 2008

कॅलिग्राफिसाठी बॅकग्राउंड

नमस्कार मित्रांनो,


आपणा सर्वांना पेंटिगच्या ब्रश बद्दल काही सांगण्याची गरज नाही. पण बाजारात पेंटींगच्या ब्रशव्यतिरिक्तही अनेक प्रकारचे ब्रश उपलब्ध असतात किंवा आहेत. उदाहरणार्थ दाढीचा ब्रश, दात घासण्याचा ब्रश, कपडे धुण्याचा ब्रश इत्यादी. या सगळ्या प्रकारच्या ब्रशपासून आपण अक्षरलेखन करू शकतो किंवा त्यांचा वापर अक्षरलेखनासाठी बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी करता येतो. फक्त थोडा आऊट ऑफ द बॉक्स विचार करण्याची गरज आहे. खाली दाढीचा ब्रश वापरून केलेली बॅकग्राउंड देत आहे. याप्रकारे वेगवेगळे ब्रश वापरून तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या बॅकग्राउंड तयार करू शकता. फक्त मेंदूवरची धूळ झटका आणि व्हा सुरू..... :)





Wednesday, December 24, 2008

स्पंजचा बोळा किंवा कागदाच्या बोळ्याने अक्षरलेखन...


नमस्कार मित्रांनो,

आजपर्यंत आपण अक्षरलेखनाची विविध साधने बघितली. पण केवळ साधनं नाहीत म्हणून अडून बसायचं काहीच कारण नाही. अगदी कुठल्याही वस्तूनी तुम्ही अक्षरलेखन करू शकता. फक्त तुमच्यातला कलाकार जिद्दीला पेटला पाहिजे आणि मुळात करण्याची इच्छा पाहिजे.... असो बौद्धीक जरा जास्तच होतं... परत विषयाकडे वळूयात. तर, वेगळ्या प्रकारचे आणि ठसठशीत असे अक्षरलेखन करण्यासाठी तुम्ही कागदच्या बोळ्याचा किंवा स्पंजच्या बोळ्याचा वापर करू शकता. तुम्हाला हव्या त्या आकारचा बोळा घेऊन तो शाईत बुडवून तुम्ही मुक्तहस्ताने अक्षरलेखन करू शकता. यासाठी तुम्ही विविध रंगांच्या इंक्स वापरू शकता. कराल तेवढं थोडं आहे. मात्र एक नक्की की या प्रकारचे मुक्तहस्त अक्षरलेखन करण्यासाठी तुमची मुळाक्षरांच्या वळणे पक्की पाहिजेत आणि त्यांचा सरावही दांडगा पाहिजे. याप्रकारच्या साधनांनी तुम्हाला वेगवेगळ्या टेक्श्चरच्या आणि जाडीच्या रेषा मिळतात. खाली एक अक्षर याप्रकाराने करून दाखवले आहे ते बघा आणि सराव करा.


Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com

Tuesday, December 23, 2008

स्क्रोल पेन्स किंवा बोल्ट पेन्स


नमस्कार मित्रांनो,

आज आपण अक्षरलेखनासाठी वापरले जाणारे जे साधन बघणार आहोत ते जरा निराळं आहे. आणि ते सहजासहजी बाजारात उपलब्धही होत नाही. मात्र त्यासारख्या आकाराच्या इतर वस्तू वापरून तुम्ही अक्षरलेखन करू शकता. हे जे साधन आहे याला स्क्रोल पेन्स किंवा बोल्ट पेन असं म्हणतात. या नीब्जही पातळ पत्र्यापासून बनवलेल्या असतात. आणि होल्डरसह विकत मिळतात. आणि शाईत बुडवून अक्षरलेखन करावे लागते. यांचा प्रचार भारतीय बाजारपेठेत अजून हवा तितका झालेला नसला तरी परदेशी बाजारपेठेत ही सर्व साधने उपलब्ध आहेत. तुम्ही स्वतः किंवा तुमचे नातेवाईक अथवा मित्र परदेशात असतील तर त्यांच्या मार्फत तुम्ही ही पेन्स मिळवू शकता.

खालची आकृती बघा म्हणजे बोल्ट पेन्सचा आकार कसा असतो ते लक्षात येईल आणि त्यांच्या साह्याने कोणत्या प्रकारचे अक्षरलेखन करता येते ते ही  लक्षात येईल.



Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com

Monday, December 22, 2008

स्पीडबॉल नीब्ज (फ्लॅट)


नमस्कार मित्रांनो,..

सर्वप्रथम बरेच दिवस पोस्ट न टाकल्याबद्दल तुमची माफी मागतो. पण काम जरा जास्त होतं. असो, मागच्या पोस्टमध्ये आपण स्पीडब़ॉल राऊंड नीब्जबद्दल माहिती घेतली होता. आता आज आपण फ्लॅट नीबची माहिती घेऊ. 
या नीब्ज ही पातळ अशा पत्र्यापासून बनवलेल्या असतात. याच्या टोकाला राऊंड आकाराएेवजी हे नीब फ्लॅट केलेले असते. वेगवेगळ्या नंबर्सप्रमाणे हा फ्लॅटनेस कमीअधिक असतो. बाकी वापरायची पद्धत राउंडनीब्जप्रमाणेच. यालाही होल्डर लागतो आणि शाईत बुडवून अक्षरलेखल करतात. खाली फ्लॅट नीब्जचे प्रकार दशर्विणारी आकृती देतो आहे. आणि या नीबच्या साह्याने केलेला एक अक्षरलेखनाचा नमुनाही देत आहे.



Thanks Prabhakar,
prabhakar.bhosale@gmail.com

Wednesday, December 10, 2008

स्पीडबॉल निब्ज




नमस्कार दोस्तांनो,
आज आपण स्पीडबॉल नीब्ज हे अक्षरलेखनाचे आणखी एक साधन बघुयात. ही नीब्ज प्रामुख्याने इंग्रजी अक्षरलेखनासाठी बनविली गेलेली आहे. याची पेन्स नाहीत. ही नीबेज होल्डरला लावून शाईमध्ये बुडवून अक्षरलेखन करतात. जसे आपण बोरूच्या साह्याने करतो तसेच. या नीब्ज पातळ पत्र्यापासून्र बनवलेल्या असतात. या नीब्ज विविध आकारांत उपलब्ध आहेत. मात्र या नीब्ज तुम्हाला फक्त ड्रॉइंग स्टेशनरीच्या दुकानातच मिळतील . स्केचपेनप्रमाणे कुठेही सहजपणे मिळणार नाहीत. आपण देवनागरी अक्षरलेखनासाठी प्रामुख्याने टोकाला राऊंड शेप असलेल्या नीब्जचा वापर करतो. कसे ते खालील आकृतीत पाहा. त्याचबरोबर स्पीडबॉल नीब्जचे विविध प्रकार दाखवणारे छायाचित्रही सोबत देत आहे.




Tuesday, December 9, 2008

राऊंड मार्कर


नमस्कार मित्रांनो,
अक्षरलेखनासाठी बाजारात सहज आणि स्वस्त उपलब्ध असलेले आणखी एक साधन म्हणजे राऊंड मार्कर. किंवा सोप्या शब्दात म्हणजे स्केचपेन म्हटलं तरी चालेल.  हा राऊंड मार्कर कशाही प्रकारे पकडला तरी एकाच प्रकारची लाईन मिळते. हे मार्कर विविध प्रकारच्या जाडीचे मिळतात. खालील आकृती बघा म्हणजे या मार्करच्या साह्याने कशा प्रकारची लाईन मिळते ते लक्षात येईल.
आजकाल बाजारात दोन रंगी मार्कर्सही उपलब्ध आहेत. त्याचेही छायाचित्र खाली देत आहे.  ते पण बघा.






Thanks prabhakar
Prabhakar.bhosale@gmail.com


Monday, December 8, 2008

अक्षरलेखनाची साधने- फ्लॅट मार्कर


नमस्कार मित्रांनो,
आजपासून आपण विविध लेखण्यांपासून अक्षरलेखन कसे करायचे त्याची माहिती घेणार आहोत.
त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे फ्लॅट मार्कर.
मार्कर हे बाजारात सहज उपलब्ध होणारे आणि अतिशय स्वस्त असे साधन आहे. (याला चिजल पॉइंट मार्कर असं म्हणतात.) याचा वापर आपण उलट व सुलट असा दोन्ही प्रकारे करू शकतो. अक्षरलेखन करताना वेगवेगळ्या प्रकारे हा मार्कर पकडून आणि कमी अधिक दाबाचा वापर करून तुम्हाला खालील प्रकारची अक्षरे काढता येतील.


Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com

kiran.velhankar@gmail.com