Tuesday, November 18, 2008

ओळखा पाहू कोणता फॉन्ट?

नमस्कार मित्रांनो,

आजची पोस्ट विशेष करून ग्राफिक डिझायनर्स किंवा कमर्शियल आर्टिस्ट मित्रांसाठी...
खूप वेळा एखादा लोगो परत रिक्रिएट करताना आपल्यापुढे प्रश्न पडतो की हा फॉन्ट कुठला? 
मी तुम्हाला विचारलं की गुगलच्या लोगोसाठी कोणता फॉंट वापरला आहे सांगू शकाल? तुम्ही म्हणाल, कसं शक्य आहे? त्यांनी वापरलेला फॉंट आपण ओळखूच शकणार नाही. आणि ओळखून करणार काय? 
आपण फॉंट अॅडिक्ट असलो तर मात्र एखादा नवा लोगो दिसला की हा फॉंट कोणता, हे चटकन ओळखतो  किंवा याच्याएेवजी तो फॉंट वापरला असता तर डिसेंसी आली असती, अशी चर्चा करतो . पण काही वेळेला एखादा नवा फॉंट आपण ओळखू शकत नाही. तो आपल्याला कुठेतरी वापरायचा तर असतो, पण त्याचा सोर्स कळत नाही. अशा वेळी व्हॉट द फॉन्ट नावाची सेवा वापरून तुम्ही तो फॉन्ट कोणता आहे, हे ओळखू शकता. 

व्हॉट द फॉन्ट ही सेवा वापरण्यास अतिशय सोपी आहे. ज्या लोगोमधील फॉन्ट ओळखायचा आहे तो लोगो अथवा लोगो एखाद्या साईटवर असल्यास त्याची लिंक अपलोड करायची. त्यानंतर व्हॉट द फॉन्टमार्फत लोगोवरून कॅरेक्टर्स ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. तुम्ही गुगलचा लोगो अपलोड केला असल्यास लोगोतील G, o, o, g, l, e ही कॅरेक्टर्स बरोबर आहे किंवा कशी हे विचारले जाते. त्यात चूक असल्यास तुम्ही दुरूस्ती करू शकता. त्यानंतर सर्च म्हटल्यावर या लोगोसाठी वापरलेल्या फॉन्टचे नाव डिस्प्ले होते. त्याच फॉन्टशी साधर्म्य असलेले अनेक फॉन्टस असतील तर त्यांची यादी पाहायला मिळते. 


गुगलच्या लोगोसाठी वापरलेला फॉंटः Catull BQ-Regular.
वापरून बघा आणि कॉमेंट करा..

Thanks to

Monday, November 17, 2008

इमेजेससाठी ‘वेट’ रिडक्शन




नमस्कार मित्रांनो,
आजची पोस्ट विशेषतः वेब डिझायनर्स मित्रांसाठी सर्वाधिक उपयुक्त आहे.

एखादी साईट अोपन होताना खूप वेळ लागला तर समजायचं की त्या साईटवर खूप हेवी फाईल्स आहेत. या सर्व फाईल्स डाऊनलोड होण्यासाठी वेळ लागतो. टेक्स्टची साईज इतर कन्टेन्टपेक्षा कमी असते. इमेजेसची साईज कमी न केल्यास वेबसाईट ओपन होण्यास वेळ लागतो. सोशल नेटवर्किंग साईटवरदेखील इमेजेस अपलोड करताना फाईल साईज अमूक एमबीपर्यंत असावी असा मेसेज दिला जातो. त्याहून अधिक साईजच्या इमेजेस अॅक्सेप्ट केल्या जात नाहीत. इमेजेसची फाईल साईज कमी करण्यासाठी प्रयत्न केले तर त्याचा दर्जा कमी होऊ शकतो. पण दर्जा कमी न करतादेखील ‘हेवी’ इमेजेसचे ‘वजन’ कमी करता येते... स्मश ईट ही सेवा वापरून आपण इमेजेसची फाईल साईज कमी करू शकतो. या सेवेचा फायदा म्हणजे फाईलचा दजर्जाही कायम राहतो आणि फाईल साईज किती टक्क्यांनी कमी झाली हे कळते. फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर वापरून तुम्ही या गोष्टी लीलया करू शकता. पण त्यात इमेजचा दर्जा घसरण्याची शक्यता असते. स्मश ईटमध्ये विशिष्ट इमेज अॉप्टिमायझेशन तंत्रज्ञान वापरून बाईट्स रिड्यूस केले जातात. त्यामुळे इमेजच्या व्हिज्युअस क्वालिटीला धक्का लागत नाही. स्मश ईटचा वापर तीन मार्गांनी करता येतोः  १. स्मश ईटवर जाऊन एक किंवा अनेक इमेजेस अपलोड करणे  २. इमेज कुठे होस्ट केलेल्या असतील तर त्यांच्या लिंक्स देणे  ३. फायरफॉक्स एक्स्टेंशनचा वापर करून इमेज साईज कमी करणे. 

साईज कमी केलेल्या इमेजेस तुम्ही झिप स्वरूपात डाऊनलोड करून घेऊ शकता. वेबसाईट डिझायनर्स किंवा अपलोडर्स यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयोगी आहे. वापरून बघा आणि उपयुक्तता कळवा.

with thanks from

Sunday, November 16, 2008

ओम या अक्षराची वळणे

नमस्कार मित्रांनो,
आज आपण शेवटचे अक्षर म्हणजे ओम ची वळणे बघणार आहोत. आपण ज्या पद्धतीने ओम लिहीतो तसा इथे ब्लॉगर मध्ये टाईप करण्याचा खूप प्रयत्न केला पण सापडलाच नाही. त्यामुळे माफ करा. आकृती बघा म्हणजे सगळी वळणे व्यवस्थित कळतील. यामध्ये अर्धवर्तुळखंडांचा वापर झालेला दिसून येतो. खालील आकृती बघा आणि त्यानुसार सराव करा. उद्यापासून 0 ते 9 या आकड्यांच्या वळणांचा ्अभ्यास करू.


Thanks Prabhakar
Prabhakar.bhosale@gmail.com

Saturday, November 15, 2008

जोडाक्षरे द्ग आणि द्न

आज ही शेवटची जोडाक्षरांची जोडी. ही आहे द्ग आणि  द्न. इथे ब्लॉगर मध्ये टाईप करताना नीट दिसत नाहीयेत. पण आकृती बघा म्हणजे नीट कळेल. या दोन्ही जोडाक्षरांतपण द  हे मुळाक्षर आहे. आणि त्याला अनुक्रमे ग आणि न ही मुळाक्षरे जोडली गेल्यामुळे त्यांच्या मुळ वळणांत थोडा फरक पडतो. आकृती बघा आणि त्यानुसार सराव करा.

Thanks Prabhakar

Friday, November 14, 2008

जोडाक्षरे द्भ आणि द्ब

चला, आज पुढची दोन जोडाक्षरे बघूयात. ही आहेत द्भ आणि द्ब. या दोनही जोडाक्षरांत द हे मुळाक्षर आहे.  या मुळाक्षराला अनुक्रमे भ आणि ब ही मुळाक्षरे जोडली जातात आणि त्यांच्या मुळ वळणांत थोडा बदल होतो. खालील आकृती बघा आणि सराव मात्र आवश्यक...


ThanksPrabhakar

Thursday, November 13, 2008

जोडाक्षरे द्ध आणि द्व

नमस्कार,
कसे आहात?

आज पुढच्या दोन जोडाक्षरांच्या वळणांचा अभ्यास करूयात. ही जोडाक्षरे आहेत द्ध आणि द्व. या दोनही जोडाक्षरांत द या मुळाक्षर आहे. खाली दिलेली आकृती बघा आणि सराव मात्र निश्चित करा.
 




Thanks Prabhakar,
Prabhakar.bhosale@gmail.com

Wednesday, November 12, 2008

जोडाक्षरे ह्य आणि द्य

नमस्कार दोस्तांनो,
आज आपण आणखी दोन जोडाक्षरे बघू. ही आहेत ह्य आणि द्य. या जोडाक्षरांमध्ये अनुक्रमे ह आणि द ही मुळाक्षरे आहेत. या दोन्ही अक्षरांना य हे मुळाक्षर जोडले गेले आहे.  खालील वळणे बारकाईने बघा आणि सराव करा.




Thanks Prabhakar,
prabhakar.bhosale@gmail.com