Thursday, November 6, 2008

मुळाक्षरे त आणि ळ


नमस्कार, 
आज आपण त आणि ळ या दोन मुळाक्षरांच्या वळणांचा अभ्यास करणार आहोत.  .यापैकी ळ हे मुळाक्षर उभ्या वर्तुळखंडातून तयार झाले आहे.  त या मुळाक्षराचे वळणही ळ या मुळाक्षराच्या जवळ जाणारे आहे. खालील आकृती बघा आणि त्यानुसार सराव करायला विसरू नका.

Wednesday, November 5, 2008

मुळाक्षरे य, थ, घ आणि ध

नमस्कार,
आज आपण य, थ आणि घ, ध या मुळाक्षरांची वळणे पाहूयात. यापैकी य, थ आणि घ, ध या मुळांक्षरांची वळणे सारखीच आहेत. पैकी थ आणि ध या मुळाक्षरांच्या रचनेत गाठींचा वापर दिसून येतो. खाली दिलेल्या आकृतीवरून त्यांचा वळणांचा अभ्यास करा आणि सरावही करा.



Thanks Prabhakar,
Prabhakar.bhosale@gmail.com

Tuesday, November 4, 2008

मुळाक्षरे भ, म आणि ए

चला, आज पुढची तीन मुळाक्षरे बघू. आज आपण भ, म आणि ए या मुळाक्षरांच्या वळणांचा अभ्यास करणार आहोत. यापैका भ आणि प या मुळांक्षरांच्या वळणांमध्ये वर्तुळखंडाचा वापर आढळतो. या मुळाक्षरांच्या गाठींचा नीट अभ्यास करा. खालील आकृती पाहा आणि त्यात दाखविल्याप्रमाणे सरावही करा.


Thanks Prabhakar

Monday, November 3, 2008

मुळाक्षरे प, ष, ण आणि फ

नमस्कार मित्रांनो,
आज आपण प,ष ण आणि फ या अक्षरांची वळणे बघूयात. या चारही मुळाक्षरांची वळणे जवळजवळ सारखीच असल्याचे तुम्हाला आढळेल. खाली दिलेल्या आकृतीनुसार वळणांचा अभ्यास करा आणि सरावही करा.



Thanks Prabhakar
prabhakar.bhosale@gmail.com

Sunday, November 2, 2008

मुळाक्षरे ह आणि झ

नमस्कार,

आज आपण ह आणि झ या दोन मुळाक्षरांची वळणे बघणार आहोत. इतर मुळाक्षरांच्या तुलनेत यांची वळणे आणि त्यांचे प्रपोर्शन थोडे अवघड आहे. या दोन अक्षरांची उंची शिरोरेषेच्या दहापट असते. (इतर मुळाक्षरांची आठपट असते.) खाली दिलेल्या आकृतीचे नीट निरीक्षण करा आणि दाखवल्याप्रमाणे सरावही करा.



Thanks Prabhakar,
For more info.. Prabhakar.bhosale@gmail.com

Saturday, November 1, 2008

मुळाक्षरे र, स आणि ख

काय दोस्तांनो. कसे आहात?
आज आपण र, स आणि ख या पुढच्या तीन मुळाक्षरांची वळणे बघणार आहोत. या तिन्ही अक्षरांच्या रचनेत तुम्हाला बरेचसे साम्य आढळून येईल. फारच थोडा फरक यांच्या वळणांमध्ये आहे. खालील आकृती पाहा आणि सराव करा.




Thanks Prabhakar.

Friday, October 31, 2008

मुळाक्षरे श आणि ग

नमस्कार मित्रांनो,

सराव सुरू आहे ना? आज आपण देवनागरीच्या पुढच्या दोन अक्षरांची वळणे बघणार आहोत. ही अक्षरे आहेत श आणि ग. या दोन्ही अक्षरांच्या रचनेत गाठींचा वापर करावा लागतो. या गाठींच्या आणि अक्षरांच्या वळणांचा नीट अभ्यास करा आणि चार्टपेपरवर त्याचा सरवा करा.




Thanks Prabhakar,
For more info... prabhakar.bhosale@gmail.com